मंगळवारी (१३ ऑक्टोबर) दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबादविरुद्ध झालेल्या आयपीएल २०२०च्या २९व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने मागील पराभवाचा वचपा काढला. हैदराबादला २० धावांनी मात देत त्यांनी हंगामातील तिसरा विजय नोंदवला. दरम्यान हैदराबादच्या वेगवान गोलंदाज टी नटराजनला त्याची ‘ड्रीम विकेट’ मिळाली.
या सामन्यात नटराजनने चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीला केन विलियम्सनच्या हातून झेलबाद केले, ही त्याची ड्रीम विकेट होती. फिरकीपटू आर अश्विनला दिलेल्या एका मुलाखतीत नटराजनने म्हटले होते की, त्याला आयपीएलमध्ये एकदातरी धोनीला बाद करत तंबूत पाठवायचे होते. धोनीला बाद करणे ही त्याचे स्वप्न असल्याचे त्याने सांगितले होते.
अखेर नटराजनने त्याचे वक्तव्य खरे केले. त्यानंतर अश्विनने ट्विट करत त्याला शुभेच्छा दिल्या. तसेच तुझ्यासाठी हा तुझ्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट क्षण ठरला असेल, असेही त्याने म्हटले.
Well done da @Natarajan_91 👏👏 . Great moment for you.🔥🔥 https://t.co/pJz2gkwXqK
— Ashwin 🇮🇳 (@ashwinravi99) October 13, 2020
तामिळनाडूच्या नटराजनने चेन्नईच्या पूर्ण डावात ४ षटके टाकत ४१ धावा दिल्या आणि धोनीसह शेन वॉटसनलाही त्याने गपगार केले. नटराजनच्या यॉर्कर गोलंदाजीने हैदराबादच्या अनुभवी गोलंदाज भुवनेश्वर कुमारची कमी भरुन काढली आहे.
टी नटराजनची कारकिर्द- टी नटराजनने आजपर्यंत १४ आयपीएल सामने खेळले असून त्यात त्याने ३३.६४च्या सरासरीने ११ विकेट्स घेतल्या आहे. २७ मे १९९१ रोजी जन्म झालेल्या २०१५ पासून आजपर्यंत २० प्रथम श्रेणी सामने, अ दर्जाचे १५ सामने व ३० टी२० सामने खेळले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
यष्टीमागे फलंदाजांची दांडी उडवण्याची ‘त्याने’ केली सेंचूरी, धोनीवरही ठरला वरचढ
Video: सुपर सिक्स! धोनीने नटराजनला मारलेला षटकार ‘या’ कारणामुळे ठरलायं खास
हॉस्पिटलमधून परतलेला गेल कधी करणार मैदानात पुनरागमन? प्रशिक्षकाने दिले उत्तर
ट्रेंडिंग लेख-
टीम इंडियाला दोन विश्वचषक जिंकून देणाऱ्या गौतम गंभीरचा आज वाढदिवस…
असे ३ खेळाडू ज्यांना किंग्ज इलेव्हन पंजाबने अंतिम ११ जणांच्या संघातून वगळले पाहिजे
दिल्लीला आयपीएल चषक जिंकायचा असेल, तर ‘या’ ३ गोष्टींकडे द्यावे लागले लक्ष