---Advertisement---

आर आश्विनला कळेनाच, की या टीमची निवड अशी कशी केलीय

On: सोमवार, एप्रिल 13, 2020 7:50 AM
---Advertisement---

कोरोना व्हायरसमुळे भारतात लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे क्रिकेटपटूंकडे घरात राहण्याशिवाय कोणताच पर्याय नाही. अशामध्ये आता काही खेळाडू सोशल मीडियाकडे वळले आहेत. भारतीय संघाचा माजी सलामीवीर फलंदाज वसीम जाफरने मार्च महिन्यात क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. तोही आता सोशल मीडियावर अधिक सक्रिय झाल्याचे दिसत आहे.

जाफरने (Wasim Jaffer) आपल्या अधिक ट्विटर अकाऊंटवरून मुंबईच्या सर्वकालीन अकरा जणांच्या (All time Mumbai XI ) संघाची निवड केली आहे. परंतु त्याच्या या संघावर भारताचा फिरकीपटू गोलंदाज आर अश्विनने (R. Ashwin) आश्चर्य व्यक्त केले आहे.

जाफरने आपल्या या सर्वकालीन ११ जणांच्या मुंबई संघाचे कर्णधारपद सुनिल गावस्कर (Sunil Gavaskar) यांच्याकडे सोपविले आहे. त्याचबरोबर भारतीय संघाचा सध्याचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माचाही (Rohit Sharma) यामध्ये समावेश केला आहे.

विदर्भ संघाला रणजी ट्रॉफीत (Ranji Trophy) २वेळा विजेतेपज मिळवून देणारा जाफरने नुकतीच रोहितची प्रशंसा केली होती. तो म्हणाला होता की, सध्याच्या खेळाडूंमध्ये रोहितकडे खेळण्याचे सर्वात चांगले आकलन आहे.

जाफरने आपल्या संघात फक्त १९७०नंतर खेळलेल्या खेळाडूंना घेतले आहे. या ११ जणांच्या खेळाडूंमध्ये जाफरने स्वत:चा समावेश केलेला नाही. त्यामुळे अश्विनने यावर आश्चर्य व्यक्त केले आहे. अश्विनने जाफरच्या ट्वीटवर कमेंट करत लिहिले की, “तू गंभीर आहेस का? वसीम भाई तुझे नाव कुठे आहे?”

यानंतर जाफरने ट्वीट करत उत्तर दिले की, “लॉकडाऊनमध्ये जाफर आपल्या घरात आहे.”

अश्विनव्यतिरिक्त अनेक चाहत्यांनी जाफरच्या या ११ जणांच्या संघामध्ये त्याचे स्वत:चे नाव नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले आहे. अनेक चाहत्यांनी जाफरशिवाय मुंबईचा संघच तयार होऊ शकत नाही, असे देखील म्हटले आहे.

असा आहे जाफरचा सर्वकालीन मुंबई संघ- (Jaffer’s All Time Mumbai Team)
सुनिल गावस्कर, रोहित शर्मा, दिलीप वेंगसरकर, सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी, चंद्रकांत पंडित (यष्टीरक्षक), साईराज बहुतुले / रमेश पवार, अजित आगरकर / अब्दुल इस्माइल, झहीर खान, अभय कुरुविला, पद्माकर शिवाल्कर, गुलाम पारकर (संघातील १२ वा खेळाडू).

ट्रेंडिंग घडामोडी-

-धोनी क्रिकेटमध्ये येण्यापुर्वी कूल क्रिकेटर म्हणून ओळख असलेले ५ खेळाडू

-जगातील ५ महान गोलंदाज, जे कधीही घेऊ शकले नाहीत वनडेत ५ विकेट्स

-मुंबई ड्रीम ११ टीम इंडियाच्या ऑल टाईम ११पेक्षाही भारी, पहा टीम

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---