विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना पार पडल्यानंतर भारतीय संघ सध्या २० दिवसांच्या सुट्टीवर आहे. त्यानंतर येत्या ऑगस्ट महिन्यात भारतीय संघाला इंग्लंड संघाविरुद्ध ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. तत्पूर्वी भारतीय संघाचा दिग्गज फिरकीपटू आर अश्विन आणखी एक मोठी क्रिकेट स्पर्धा खेळताना दिसून येऊ शकतो.
इएसपीएन क्रिकइन्फोच्या मते, काउंटी चॅम्पियनशिप स्पर्धेत येत्या ११ जुलैपासून सर्रे संघाला समरसेट संघाविरुद्ध सामना खेळायचा आहे. या सामन्यात भारतीय संघाचा दिग्गज फिरकीपटू आर अश्विन सर्रे संघाकडून खेळताना दिसून येऊ शकतो. अश्विनने यापूर्वी काउंटी चॅम्पियनशिप स्पर्धेत नॉटिंघमशायर और वोर्सेस्टरशायर संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. (R Ashwin Will play for Surrey team in county championship before India vs England test series)
भारतीय संघाला २० दिवसांच्या विश्रांतीनंतर ४ ऑगस्टपासून इंग्लंड संघाविरुद्ध ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. या मालिकेसाठी १४ जुलै रोजी सर्व खेळाडू लंडनमध्ये एकत्र येणार आहेत. तसेच कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वी भारतीय संघाला इंग्लंड सिलेक्ट काउंटी इलेव्हनसोबत तीन दिवसांचा सराव सामना खेळायचा आहे.
नुकत्याच पार पडलेल्या विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत आर अश्विन सर्वाधिक गडी बाद करणारा गोलंदाज ठरला होता. त्याने या स्पर्धेत एकूण १४ कसोटी सामन्यात ७१ गडी बाद केले होते. तसेच त्याने कसोटी क्रिकेटमध्ये आतापर्यंत एकूण ७९ सामने खेळले आहेत. यात त्याने तब्बल ४१३ गडी बाद केले आहेत. अशात काउंटी क्रिकेट खेळल्याने अश्विनला इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेत मोठा फायदा होऊ शकतो.
इंग्लंडविरुद्धची पाच सामन्यांची कसोटी मालिका
पहिली कसोटी- ४ ते ८ ऑगस्ट, नॉटिंघम
दुसरी कसोटी- १२ ते १६ ऑगस्ट, लॉर्ड्स
तिसरी कसोटी- २५ ते २९ ऑगस्ट, लीड्स
चौथी कसोटी- २ ते ६ सप्टेंबर, द ओव्हल
पाचवी कसोटी- १० ते १४ सप्टेंबर, मॅनचेस्टर
महत्वाच्या बातम्या-
त्यावेळी एमएस धोनी बनला होता चक्क टीम इंडियाचा ड्राइव्हर!
रोहित अन् ‘हा’ फलंदाज करणार ओपनिंग, शॉला इंग्लंडला पाठवण्याची मागणी निवडकर्त्यांनी फेटाळली!
इंग्लंड संघात कोरोनाची एंट्री, भारतीय खेळाडूंच्या बचावासाठी बीसीसीआयचा मोठा निर्णय; करणार ‘हे’ काम