वेस्ट इंडीजला मायदेशातील कसोटी मालिकेतील पहिल्याच सामन्यात भारताकडून पराभव स्वीकारावा लागला. मात्र, त्यांचा अष्टपैलू खेळाडू रखीम कॉर्नवॉल याच्यासाठी हा सामना एका अर्थाने खास ठरला. रखीमने कॉर्नवॉलने या सामन्यात भारतीय दिग्गज विराट कोहली याची विकेट घेतली. विशेष म्हणजे कॉर्नवॉलने अशा चेंडूवर त्याची विकेट घेतली, ज्यावर विराट क्वचितच विकेट गमावतो. या विकेटचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
रखीम कॉर्नवॉल (Rahkeem Cornwall) मागच्या मोठ्या काळापासून वेस्ट इंडीज संघातून बाहेर होता. त्याने अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना नोव्हेंबर 2021 मध्ये खेळला होता. त्यानंतर सुमार दोन वर्षांनी त्याला पुन्हा एकदा वेस्ट इंडीजसाठी आंतरराष्ट्रीय सामना खेळण्याची संधी मिळाली. त्याने ही संधी साधली, असेही आपण म्हणू शकतो. कारण वेस्ट इंडीज जरी या सामन्यात मोठ्या अंतराने परभूत झाली असली, तरी कॉर्नवॉलने विराट कोहली (Virat Kohli) सारखी महत्वाची विकेट संघाला मिळवून दिली. विराट खेळपट्टीवर सेट झालेला असताना त्याला बाद केल्यामुळे कॉर्नवॉलचे भारत-वेस्ट इंडीजसह जगभरात कौतुक होत आहे.
कॉर्नवॉलने टाकेलल्या लेक स्पिन चेंडूवर विराटने फाइन लेगच्या दिशेने शॉट खेळला. पण यावेळी फाइन लेगवर खेळाडू तैनात आहे, ही गोष्ट विराट बहुतेक विसरला होता. परिणामी त्याला विकेट गमवावी लागली. अलिक अथनाझे याने त्याचा झेल घेतला आणि विराटला खेळपट्टी सोडावी लागली. भारतीय संघाच्या धावसंख्या 405 असताना विराटने विकेट गमावली. वैयक्तिक 76 धावा करून तो तंबूत परतला. या धावा करण्यासाठी त्याने 182 चेंडू खेळले आणि 5 चौकार मारले.
तत्पूर्वी पहिल्या डावात बारतासाठी सलामीवीर यशस्वी जयसवाल आणि रोहित शर्मा यांनी अनुक्रमे 171 आणि 103 धावांची महत्वपूर्ण खेली केली होती. वेस्ट इंडीजने प्रथम फलंदाजी करताना 150 धावांवर समाधान मानले. प्रत्युत्तरात जयसवाल, रोहित आणि विराट यांच्या महत्वपूर्ण योगदानामुळे भारताने 5 बाद 421 धावा केल्या. त्यानं वेस्ट इंडीज संघ आपल्या दुसऱ्या डावात अवघ्या 130 धावांवर गुंडाळला गेला. (Rahkeem Cornwall took Virat Kohli’s Wicket in first test against West Indies)
महत्वाच्या बातम्या –
एशियन गेम्समधून तयार होणार नवी टीम इंडिया? बीसीसीआयची नजर भविष्यावर
शिखरची आंतरराष्ट्रीय कारकीर्द समाप्त! एशियन गेम्ससाठी संघात स्थान नाही, चाहते म्हणतायेत…