शारजाह। शुक्रवारी (२३ ऑक्टोबर) चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात सामना पार पडला. या सामन्यात चेन्नईचा क्रिकेटपटू दिपक चाहरला त्याचाच लहान भाऊ राहुल चाहरने बाद केले.
या सामन्यात चेन्नईची फलंदाजी मुंबईच्या भेदक माऱ्यासमोर पूर्णपणे निष्प्रभ ठरली. चेन्नईने ३ धावांतच ४ विकेट्स गमावल्या होत्या. त्यानंतर रविंद्र जडेजा आणि कर्णधार एमएस धोनीने संघाचा डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. पण जडेजा ७ आणि धोनी १६ धावा करुन बाद झाला. त्यामुळे ८ व्या क्रमांकावर दिपक फलंदाजीला आला. पण तोही खास काही करु शकला नाही.
दिपक ८ व्या षटकात फलंदाजी करत असताना समोर त्याचा भाऊ राहुल गोलंदाजी करत होता. राहुलच्या या षटकातील ५ व्या चेंडूवर दिपकने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा फटका चूकला आणि चेंडू बॅटला न लागता यष्टीरक्षक क्विंटॉन डिकॉकच्या हातात गेला. डिकॉकनेही कोणतीही चूक न करता चपळाईने दिपकला यष्टीचीत केले. दिपक ५ चेंडू खेळून शुन्यावर बाद झाला.
https://twitter.com/razz_sanjeet/status/1319652283617927168
सामन्याआधी राहुलने दिली होती दिपकला चेतावणी
या सामन्याआधी मुंबईने ट्विटर अकाउंटवर शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये बोलताना राहुल म्हणाला होता की, “आजच्या सामन्यात माझा संघ जिंकल्यानंतर मला जास्त बोलायला आवडेल. मला आठवण आहे, २०१८ साली त्याचा संघ जिंकल्यानंतर त्याने(दिपकने) मला चिडवले होते. त्यामुळे गतवर्षी जेव्हा माझा संघ जिंकला, तेव्हाही मी त्याला चिडवण्याची संधी गमावली नव्हती. त्यामुळे आजच्या सामन्यात जर माझा संघ जिंकला, तर मी त्याला चिडवणार आहे.”
#CSKvMI. Chahar vs Chahar 🔥
What’s the rivalry like in this family?#OneFamily #MumbaiIndians #MI #Dream11IPL @rdchahar1 @deepak_chahar9 pic.twitter.com/LX2tcpvbHx
— Mumbai Indians (@mipaltan) October 23, 2020
तसेच शेवटी बोलताना राहुलने म्हटले की, “आम्ही एकमेकांविरुद्ध खेळल्यानंतर जास्त बोलत नाहीत. आम्हाला दोघांनाही हे माहिती आहे की, आपापल्या संघासाठी आम्हाला आमचे १०० टक्के उत्कृष्ट द्यायचे आहे. मी त्याच्याविरुद्ध खेळताना त्याला इतर खेळाडूंप्रमाणे समजूनच खेळत असतो.”
महत्त्वाच्या बातम्या –
धावा करण्यात मागे पडलेली सीएसके विक्रमांत मात्र आघाडीवर, पाहा काय केलाय विक्रम
‘जिंकणारा संघ नव्हे हा तर वृद्ध कल्याण केंद्र’, माजी क्रिकेटरची सीएसकेवर बोचरी टीका
ट्रेंडिंग लेख –
‘त्याच’ नाव जरी घेतलं तरी लोकं म्हणायचे, ‘यावर्षी किती कोटी रुपये?’
“कॅप्टन! मी उद्या वर्ल्डकप फायनल खेळणार आहे”, बोट तुटलेले असतानाही ‘तो’ मैदानात उतरला
तुमच्यात इतकेच कौशल्य असेल तर पोराला क्रिकेटर बनवून दाखवा!