आयसीसी विश्वचषक 2023 स्पर्धा अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. स्पर्धेचा पहिला उपांत्य सामना बुधवारी (दि. 15 नोव्हेंबर) भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात वानखेडे स्टेडिअम येथे पार पडला. हा सामना भारताने 70 धावांनी जिंकत अंतिम सामन्याचे तिकीट मिळवले. भारतीय संघ अंतिम सामना खेळणार असला तरी, हा सामना भारतीय संघाचे विद्यमान मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा प्रशिक्षक म्हणून अखेरचा सामना ठरणार का याबाबत अद्याप कोणतीही माहिती उपलब्ध झालेली नाही.
भारतीय संघाने या विश्वचषकात अफलातून कामगिरी करत सर्व दहा सामने आत्तापर्यंत जिंकले आहे. अंतिम सामन्यात देखील विजयाचा दावेदार भारतालाच मानले जातेय. भारताच्या या यशाचे बरेच श्रेय मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड व सपोर्ट स्टाफ यांना जाते. मात्र, या विश्वचषकानंतर या सर्वांचा करार संपुष्टात येत आहे.
बीसीसीआयने 2021 च्या अखेरीस द्रविड यांच्या नेतृत्वातील या सपोर्ट स्टाफला भारतीय संघासोबत जोडले होते. यामध्ये फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोर, गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांब्रे व क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी दिलीप यांचा समावेश होता. विश्वचषकातील कामगिरी पाहता बीसीसीआय या सर्वांच्या कराराचे नूतनीकरण करण्याची शक्यता आहे. मात्र, राहुल द्रविड हे भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहणार का याबाबत संदिग्धता आहे.
कारण, द्रविड हे स्वेच्छेने या पदावरून बाजूला होऊ शकतात. यापूर्वी अशी देखील माहिती मिळत होती की, द्रविड यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाला विश्वचषकात अपयश आल्यास त्यांचा करार रद्द होऊ शकतो. या विश्वचषकानंतर होणाऱ्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या टी20 मालिकेत मात्र भारताच्या मुख्य प्रशिक्षकपदाची धुरा सांभाळणार आहेत. या मालिकेसाठी भारताच्या संपूर्ण सपोर्ट स्टाफला विश्रांती देण्यात येईल.
(Rahul Dravid Might Resign As Head Of India After ODI World Cup)
महत्वाच्या बातम्या –
IND vs NZ Semi Final: जेव्हा सर्वांसाठी व्हिलन बनला होता शमी, बुमराहनेही लपवलेलं तोंड- Video
Semi Final 2: पावसामुळे SAvAUS सामना रद्द झाला, तर भारतासोबत कोणता संघ खेळणार Final? लगेच घ्या जाणून