---Advertisement---

ज्या गोलंदाजाला सलग ३ चौकार मारले, त्यालाच राहुल द्रविड म्हणाला, यंग मॅन…

---Advertisement---

भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविड त्याच्या दमदार फलंदाजीबरोबरच त्याच्या शांत आणि नम्र स्वभावासाठीही ओळखला जातो. नुकतेच वेस्ट इंडिजचा माजी वेगवान गोलंदाज टिनो बेस्टने द्रविडबद्दलची एक आठवण सांगताना त्याच्या नम्र स्वभावाचे कौतुक केले आहे.

2005 ला वेस्ट इंडिज विरुद्धच्या सामन्यात द्रविडने बेस्टच्या गोलंदाजीवर सलग तीन चौकार मारले होते. पण त्या सामन्यानंतर द्रविडने बेस्टशी संवाद साधत त्याचे मनोबल वाढवले होते. याबरोबर बेस्टने भारताचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंगबद्दलही बोलताना सांगितले की त्याने त्याची बॅट भेट म्हणून दिली होती.

स्पोर्ट्सकिडाला दिलेल्या मुलाखतीत बेस्ट म्हणाला, ”2005 मध्ये इंडियन ऑईल कप मालिकेत मी पहिल्यांदा भारताविरुद्ध खेळलो. मी राहुल द्रविडला गोलंदाजी केली तो माझ्यासाठी एक अनुभव होता. त्याने मला 3 सलग चौकार मारले. मला आठवते, सामन्यानंतर आम्ही चांगली चर्चा केली.”

“द्रविड मला म्हणाला, ‘यंग मॅन, मला तूझ्यातील उर्जा आवडली. ती उर्जा कायम ठेव. तूला चौकार मारले म्हणून तू थांबू नको.’ मी विचार केला, तो खूप नम्र आणि चांगला आहे. भारतीय क्रिकेटपटूंवर माझे नेहमीच प्रेम होते, युवराजने एकदा मला एक बॅट भेट दिली आणि मला वाटले की ते खूप छान गोष्ट होती.”

याबरोबरच भारतीय क्रिकेटपटूंचे कौतुक करताना बेस्ट म्हणाला, “भारतीय क्रिकेटपटूंसोबत आलेल्या माझ्या अनुभवावरून मी सांगतो ते सर्व खरोखर खूप छान होते. राहुल द्रविड आणि सर्वजण चांगले आणि सभ्य होते. त्यांना 1.5 अब्ज लोकांचा पाठिंबा मिळत असतानाही, त्यांनी अभिमान बाळगला नाही. ते खूप नम्र होते, त्याच गोष्टीचे मला कौतुक होते. त्याच्यात कधीही वाईट उर्जा नव्हती. ते नेहमी खेळाबद्दल आदर आणि प्रेम दर्शवतात.”

बेस्टने याआधीही सचिन तेंडुलकरच्या माणुसकीबद्दल कौतुक केले होते.

ट्रेंडिंग घडामोडी – 

कांबळीने केला खुलासा, पाकिस्तानी क्रिकेटपटू त्याच्यासाठी बनला होता पोस्टमन, फॅनचे पत्र…

६८ वर्षांपूर्वी भारताने केवळ २२३ मिनिटांत दोन वेळा धरला होता तंबूचा रस्ता

जेव्हा महिला होस्टला गेल म्हणतो; ‘लाजू नको बेबी, माझ्याबरोबर डेटवर येणार का?’

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---