भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात पार पडलेल्या ३ वनडे सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाने २-१ ने विजय मिळवला होता. आता या दोन्ही संघांमध्ये टी-२० मालिकेचा थरार रंगला आहे. या मालिकेतील पहिला टी-२० सामना रविवारी (२५ जुलै) पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने ३८ धावांनी विजय मिळवला. या सामन्यात सूर्यकुमार यादवने चौफेर फटकेबाजी करत अर्धशतक झळकावले. परंतु पुढच्याच चेंडूवर तो झेलबाद होऊन माघारी परतला होता. हे पाहून मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड निराश झाल्याचे पहायला मिळाले.
सूर्यकुमार यादवला जेव्हापासून भारतीय संघात खेळण्याची संधी मिळाली आहे. तेव्हापासून प्रत्येक सामन्यात तो स्वतःला सिद्ध करण्यासाठी प्रयत्नशील आहे. नुकत्याच पार पडलेल्या वनडे मालिकेत त्याने १ अर्धशतक झळकावले होते. तसेच पहिल्या टी-२० सामन्यात देखील त्याने चौफेर फटकेबाजी करत अर्धशतक झळकावले. त्याने ३४ चेंडूत ५ चौकार आणि २ षटकारांच्या साहाय्याने ५० धावांची खेळी केली.
सूर्यकुमार यादव ज्याप्रकारे फलंदाजी करत होता ते पाहून असे वाटत होते की, भारतीय संघ या सामन्यात १९० पेक्षा अधिक धावा करेल. त्याने १६ व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर षटकार मारत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर देखील त्याने मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता. परंतु हा प्रयत्न फसला आणि तो झेलबाद होऊन माघारी परतला. सूर्यकुमार यादवला अशाप्रकारे बाद होताना पाहून मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड निराश झाले होते. (Rahul Dravid reaction on Suryakumar yadav dismissal)
https://twitter.com/im_maqbool/status/1419351894380613637?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1419351894380613637%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fwww.hindustantimes.com%2Fcricket%2Find-vs-sl-rahul-dravid-s-disappointed-reaction-after-suryakumar-yadav-gets-out-after-scoring-fifty-watch-101627260914912.html
भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटक अखेर १६४ धावा केल्या होत्या. यामध्ये सूर्यकुमार यादवने सर्वाधिक ५० आणि कर्णधार शिखर धवनने ४६ धावांचे योगदान दिले. या धावांचा पाठलाग करताना श्रीलंका संघाकडून चरिथ असलंकाने ४४ आणि अविष्का फर्नांडोने २६ धावांची खेळी केली. श्रीलंका संघाचा डाव १८.३ षटकात संपुष्टात आला होता. या सामन्यात भारतीय संघाने ३८ धावांनी विजय मिळवला. तसेच ३ टी-२० सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
SLvIND: त्यांनी माझ्या डोक्यावरचा भार हलका केला; कर्णधार धवनने ‘या’ २ खेळाडूंना दिले विजयाचे श्रेय
भुवीने उद्ध्वस्त केला श्रीलंकेचा डाव, ४ विकेट्स घेत ‘ही’ अतुलनीय कामगिरी करणारा ठरला केवळ दुसराच
एक ही तो दिल है, कितनी बार जितोगे! हार्दिकने विरोधी संघाच्या फलंदाजाला भेट दिली स्वत:ची बॅट