-अक्षय खोमणे
बारामती येथे झालेल्या १४ वर्षीय राज्यस्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेमध्ये एका खेळाडूने खरच सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. खेळाडूंचा नाव राज पंकज राठोड, अमरावती विभागातून नांदेड जिल्ह्यातील, किनवट तालुक्यातील निराळा गावातील हा खेळाडू. १४ वर्ष खालील शालेय कबड्डी स्पर्धेच्या निवड चाचणीसाठी बारामती येथे आला होता.
राज्य निवड चाचणीसाठी अमरावती विभागातून आलेला हा खेळाडू जन्मताच अपंग. मनगटापासून हातचं नाही, म्हणजे एका हाताने पकड करणे कठीण तरी हा खेळ कोणता खेळतो तर कबड्डी? होय कबड्डीच !! विश्वास बसणार नाही पण खरंच अपंगत्व असूनही हा खेळाडू कबड्डीच्या मैदानावर लढतोय. इथं हात तुटायच्या भीतीनं कबड्डी खेळयाचं म्हटलं तर हात जोडतात.
आणि हा राज जन्मतःच हात नाही. तरीही त्याने कबड्डी खेळ निवडला. हात नसल्यामुळं कबड्डीमध्ये बचाव करता येत नाही, म्हणून पठ्ठयाने चढाईची बाजू निवडली व अमरावती विभागातून निवड होऊन राज्य निवड चाचणीसाठी आला .
चेहऱ्यावर कसलंच दडपण नाही, तोच बाकी खेळाडूंसारखा आत्मविश्वास आणि मांडी थापटण्याची ढब ही तीच, अंगात मेहनत ही तशीच आणि चेहऱ्यावर तेज तसंच.
सडसडीत मांड्या, थाप टाकताक्षणी थाड-थाड आवाज काढणाऱ्या राजला फक्त डाव्या कोपऱ्याच्या हाताला खेळता येत. म्हणून हा राज आपल्या एक हात दोन पाय आणि अगणित इच्छा शक्ती घेऊन प्रतिस्पर्ध्याच्या कोंड्यात जाऊन गुण टिपून येतो.
प्रचंड इच्छाशक्ती आणि आपल्या एका हातावर असलेला विश्वास त्या जोरावर खोलवर चढाया करून तो गुण टिपत होता. अपंगत्वाच तोटा त्याला नक्कीच होत होता पण तो फक्त राज राठोडला होत होता परंतु कबड्डी खेळणाऱ्या कबड्डीपटू राजला नाही. खरच या लाल मातीतील खेळाची किमया आणि राज कबड्डीवर असणार प्रेम यातून दिसून येत.
आज या राजने दाखवून दिलं कि खेळण्यासाठी शरीर जोड नसलं तरी न डगमगता ते तस निर्माण करता हि येत. राज ने खरच दाखवून दिलं कि हात नसला म्हणून काय झालं त्याच्यापेक्षा मोठा आत्मविश्वास आणि खेळण्याची इच्छा मोठी आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
–टी२० मालिका सुरू होण्यापुर्वी ही आकडेवारी तुम्हाला नक्की माहित हवीच
–पुढच्या ४८ तासांनी रोहितचे नाव टी२०मध्ये सुवर्णाक्षरांनी लिहीले जाणार
–नाद कॅच! ग्लेन मॅक्सवेलने घेतला २०१८मधील सर्वात जबरदस्त कॅच
–अशी गोलंदाजी तूम्ही क्रिकेटमध्ये यापुर्वी १००% पाहिली नसेल
–त्यावेळी एमएस धोनी बनला चक्क टीम इंडियाचा ड्राइव्हर!
–असे टीम इंडियाच्या बाबतीत पहिल्यांदाच घडले!