---Advertisement---

पदार्पण गाजवलं, आता अभिनेत्री अनन्या पांडेसोबत जायचंय डेटवर; राजस्थानच्या नवख्या शिलेदाराची ‘मोठी विश’

On: गुरूवार, एप्रिल 15, 2021 1:38 PM
---Advertisement---

आयपीएलमधील राजस्थान रॉयल्स संघाने मंगळवार (13 एप्रिल) रोजी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये संघाचा वेगवान गोलंदाज आकाश सिंग आणि चेतन सकारिया हे दोघे मजेदार पद्धतीने एकमेकांची मुलाखत घेताना दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये चेतन सकरियाने बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेसोबत डेटवर जाण्याची इच्छा व्यक्त केली असून सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ वायरल होत आहे.

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्स या सामन्यात राजस्थान संघातील चेतन सकारियाने आयपीएल पदार्पण केले. या सामन्यात त्याने चार षटकांमध्ये 31 धावा देऊन पंजाब संघाच्या तीन फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवत प्रशंसा मिळवली. राजस्थान संघाने लिलावात त्याला 1 कोटी 20 लाख रुपये देऊन आपल्या ताफ्यात सामील केले होते.

पदार्पण सामन्यात त्याने बाद केलेल्या खेळाडूंमध्ये पंजाब संघाचा सलामी फलंदाज मयंक अग्रवाल, तसेच 91 धावांवरती खेळत असलेला पंजाब संघाचा कर्णधार केएल राहुल आणि झाय रिचडर्सन यांचा समावेश होता. चमकदार कामगिरी करूनही राजस्थान रॉयल्सने हा सामना गमावला असला तरी चेतनच्या सर्वोत्कृष्ट कामगिरीची चर्चा सर्वत्र झाली.

सामान्यानंतर घेतलेल्या मुलाखतीत आकाश सिंगने चेतनला कोणत्या बॉलिवूड अभिनेत्रीसोबत डेटवर जायची इच्छा आहे? असे विचारले असता या गोलंदाजाने अनन्या पांडेचे नाव घेतले. तो म्हणाला की, “अनन्या ही खूपच सुंदर असून मी तिच्यासोबत एखाद्या समुद्र किनाऱ्यावर बसून कॉफीचा आनंद घेऊ इच्छित आहे.”

आज (१५ एप्रिल) संध्याकाळी राजस्थान रॉयल्सचा सामना दिल्ली कॅपिटल्सशी होणार आहे. या सामन्यात विजय मिळवून राजस्थान रॉयल्स आपल्या यंदाच्या मोसमातील विजयाचे खाते उघडण्यास उत्सुक असणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

कृणाल पंड्यासोबत झालेल्या वादानंतर ‘या’ खेळाडूंनी केली होती दीपक हुडाला मदत; वडिलांनी केला खुलासा

बेजबाबदार फलंदाजीने SRHची दयनीय अवस्था, संघ मालकाची लेक आली रडकुंडीला; फोटो व्हायरल

व्वा! वॉशिंग्टन सुंदरच्या प्रदर्शनाची ‘भारताच्या फुलराणी’ला पडली भुरळ, कौतुक करत म्हणते…

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---