Bihar Cricket Association Controversy: रणजी ट्रॉफी 2023-24 चा पहिला दिवस बिहार संघासाठी बातम्यांनी भरलेला होता. बिहारचा पहिला सामना मुंबई विरुद्ध पटना येथील मोईन-उल-हक स्टेडियमवर होणार होता. मुंबईविरुद्धचा हा सामना खेळण्यासाठी बिहारचे एक नाही तर दोन संघ मैदानात उतरले. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, बिहार क्रिकेट असोसिएशनच्या दोन गटांमधील भांडण मैदानात पोहोचले. खेळ सुरू असताना अधिकाऱ्यांमध्ये जोरदार वादावादी आणि किरकोळ बाचाबाची झाली. प्रकरण इतके वाढले की पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. मात्र, पोलिस आल्याने प्रकरण वेळीच आटोक्यात आले आणि दुपारी एकच्या सुमारास बिहार-मुंबई सामना सुरू झाला.
मुंबईविरुद्धचा सामना खेळण्यासाठी सकाळीच मैदानावर पोहोचलेल्या दोन संघांपैकी एक संघ बीसीएचे अध्यक्ष राकेश तिवारी यांनी निवडला होता, तर दुसरा संघ सचिव अमित कुमार यांचा होता. आश्चर्याची बाब म्हणजे या संघात एकही क्रिकेटपटू नाही ज्याचे नाव दोन्ही संघात आहे.
बीसीएचे अध्यक्ष राकेश तिवारी म्हणाले, “आम्ही गुणवत्तेच्या आधारावर संघ निवडला असून तो योग्य संघ आहे. बिहारमधून आलेले टॅलेंट तुम्हाला दिसते. आमच्याकडे एक क्रिकेटर साकिब हुसेन आहे ज्याची आयपीएलमध्ये निवड झाली आहे. आमच्याकडे 12 वर्षांचा एक प्रतिभावान खेळाडू आहे जो खेळात पदार्पण करत आहे. दुसऱ्याची संघाची निवड निलंबित सचिवाकडून होत असल्याने तो खरा संघ असू शकत नाही.”
Ajinkya Rahane received warm welcome during Mumbai vs Bihar Ranji Trophy matchpic.twitter.com/12uci7Z6Eq
— Don Cricket 🏏 (@doncricket_) January 5, 2024
दरम्यान, सचिव अमित यांनी तिवारी यांच्या निलंबनाच्या दाव्याला आव्हान दिले. ते म्हणाले, “सर्व प्रथम मी निवडणूक जिंकलो, आणि मी बीसीएचा अधिकृत सचिव झालो. तुम्ही सचिवाला निलंबित करू शकत नाही. दुसरे म्हणजे अध्यक्ष संघाची निवड कशी करतात? बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी (Roger Binny) यांना संघाची घोषणा करताना तुम्ही कधी पाहिले आहे का? तुम्हाला नेहमी सचिव जय शहा (Jay Shah) यांची स्वाक्षरी दिसेल.”
बीसीएने एका प्रसिद्धीपत्रकात निलंबित सचिव अमितला बनावट संघासह येऊन गेटवर एका अधिकाऱ्यावर हल्ला केल्याचा आरोप केला आहे. (Ranji Trophy 2023-24 2 teams from Bihar arrive to play against Rada Mumbai during Ranji Trophy match)
हेही वाचा
Ranji Trophy: अतिशय महत्त्वाचा सामना सुरू असलेल्या स्टेडियमवर लोकांनी वाळायला टाकलेत कपडे, पाहा दुर्दशा
INDW vs AUSW: स्मृती मंधानाने रचला इतिहास, टी20मध्ये ‘असा’ कारणामा करणारी ठरली दुसरी भारतीय