सूर्यकुमार यादव भारताच्या एकदिवसीय संघातून बाहेर आहे. त्याने 2023 मध्ये टीम इंडियासाठी शेवटचा एकदिवसीय सामना खेळला आहे. तसेच, तो आता टी20 स्वरूपातही खराब फाॅर्ममधून जात आहे. सूर गवसण्यासाठी तो आता सूर्या रणजी ट्रॉफीसाठी मैदानात उतरेल. तो मुंबईकडून रणजी ट्रॉफी 2025 चा क्वार्टर फायनल सामना खेळू शकतो. शुक्रवारी सूर्या सरावासाठी मैदानात आला. पण सूर्याला कर्णधारपद मिळणार नाही.
रणजी ट्रॉफी 2025 चा तिसरा क्वार्टर फायनल सामना आज शनिवारपासून मुंबई आणि हरियाणा यांच्यात खेळला जाईल. हा सामना कोलकात्यातील ईडन गार्डन्सवर होणार आहे. या सामन्याच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये सूर्याचा समावेश होऊ शकतो. तो मुंबई संघाचा एक भाग आहे. सूर्या बऱ्याच काळापासून फलंदाजीत चांगली कामगिरी करू शकलेला नाही. पण तो या सामन्यातून फॉर्ममध्ये येण्याचा प्रयत्न करेल.
सूर्यकुमार यादव हा मुंबई संघाचा भाग आहे. पण अजिंक्य रहाणे हा मुंबईचा नियमित कर्णधार आहे. रहाणे बऱ्याच काळापासून संघाचे नेतृत्व करत आहे. तो एक वरिष्ठ खेळाडू देखील आहे. तर सूर्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत आहे. तो टी20 स्वरूपात भारताचा कर्णधार आहे. त्यामुळे, मुंबई उपांत्यपूर्व फेरीसाठी आपल्या नियमित कर्णधाराला संधी देईल.
SURYAKUMAR YADAV IS READY FOR THE RANJI TROPHY QUARTER FINAL…!!!! ⚡ pic.twitter.com/zmnJC2wY8O
— Johns. (@CricCrazyJohns) February 7, 2025
शुक्रवारी सूर्याने मुंबई संघासोबत घाम गाळला. जर आपण सूर्यकुमारच्या गेल्या 10 डावांवर नजर टाकली तर तो सतत अपयशी ठरत आहे. सूर्याने भारतासाठी पाच टी20 सामने खेळले. या दरम्यान तो दोनदा शून्यावर बाद झाला. एकदा तो 2 धावा काढून बाद झाला होता. राजकोटमध्ये 14 आणि चेन्नईमध्ये 12 धावा केल्यानंतर तो बाद झाला. गेल्या पाच सामन्यांमध्ये सूर्याने मुंबईसाठी काही खास कामगिरी केलेली नाही. गेल्या वर्षी 21 डिसेंबर रोजी कर्नाटकविरुद्ध 20 धावा केल्यानंतर तो बाद झाला होता. यानंतर, 23 डिसेंबर रोजी, हैदराबादविरुद्ध 18 धावा करून तो बाद झाला. तर पंजाब आणि पुद्दुचेरीविरुद्ध खातेही उघडू शकला नाही.
हेही वाचा-
टीम इंडियाचा अभिमान! बीसीसीआयकडून विश्वविजेत्यांसाठी खास “चॅम्पियन्स रिंग”!
“थोडं अजून संयम ठेवलं असतं तर…”, गिलच्या अपूर्ण शतकावर त्याचीच प्रतिक्रिया!
कन्कशन सबस्टिट्यूटवर टीका, पण हर्षित राणाने दिलं शब्दांपेक्षा बळकट उत्तर!