Ranji Trophy : रणजी ट्रॉफी स्पर्धेत अनेक सामने हे रंगतदार पहायला मिळत आहेत. तर ड गटामधील मध्य प्रदेश आणि बडोदा यांच्यात सामना खेळवला गेला होता. अशातच आता या सामन्यात मध्य प्रदेशने बडोद्याचा एक डाव आणि 52 धावांनी पराभव केला आहे. तसेच, इंदूरच्या होळकर स्टेडियमवर बडोद्याविरुद्ध खेळल्या गेलेल्या या सामन्यात टीम इंडियाला एक नवा झहीर खानसारखा गोलंदाज मिळाल्याचं पहायला मिळालं आहे. त्यामुळे आता सिलेक्टर्सचं लक्ष या युवा गोलंदाजांवर आहे.
मध्य प्रदेश आणि बडोदा यांच्यातील सामन्यात कुलवंत खेजरोलिया याने घातक गोलंदाजीचं प्रदर्शन करत 4 बॉलमध्ये 4 विकेट्स काढल्या आहेत. कुलवंत खेजरोलिया याने सामन्याच्या दुसऱ्या डावात 34 धावांत 5 बळी घेतले असून रणजी ट्रॉफीच्या इतिहासात सलग 4 चेंडूत चार विकेट घेणारा तो केवळ तिसरा गोलंदाज ठरला आहे.
तसेच मध्य प्रदेशने पहिल्या डावात 454 धावांचा डोंगर उभारला आहे. त्याला प्रत्युत्तर देताना बडोदाचा संघ 132 धावांवर गारठला. त्यामुळे त्यांना फॉलोऑन घेण्याची वेळ आली. अशातच दुसऱ्या डावात मोठी धावसंख्या उभारेल, अशी शक्यता वाटत असताना मध्य प्रदेशच्या गोलंदाजांनी भेदक गोलंदाजी केली अन् बडोदाचा दुसरा डाव 270 धावांवर आटोपला होता. त्यामुळे कुलवंत खेजरोलिया याला त्याच्या दमदार कामगिरीबद्दल सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला आहे.
याबरोबरच, कुलवंत खेजरोलियाने बडोद्याच्या दुसऱ्या डावातील 95 व्या षटकातील दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या चेंडूवर शाश्वत रावत, महेश पिठिया, भार्गव भट्ट आणि आकाश सिंग यांची विकेट घेतली. कुलवंत खेजरोलिया याच्या आधी दिल्लीचा शंकर सैनी आणि जम्मू-काश्मीरचा मोहम्मद मुधासीर यांनी 4 बॉलमध्ये 4 विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे.
दरम्यान, झहीर खानची गोलंदाजी आणि कुलवंत खेजरोलिया याच्या गोलंदाजीत काहीसं साम्य दिसून येतंय. तसेच दोघंही डावखुरे फास्टर गोलंदाज आहेत. तर दोघंही बॉलची ग्रीप लपवून टाकतात. त्यामुळे फलंदाजाला बॉल फलंदाजांना समजत नाही.
महत्वाच्या बातम्या –
- Ranji Trophy : ईशान-श्रेयसबाबत बीसीसीआयला जाग! रणजी ट्रॉफी खेळणे केले अनिवार्य…
- Ind vs Eng : तिसऱ्या कसोटीत एकत्र खेळू शकतात ‘हे’ खेळाडू, तर बेन स्टोक्स खेळणार 100वा कसोटी सामना