देशांतर्गत क्रिकेटमधील मानाची रणजी ट्रॉफी (ranji trophy 2022) स्पर्धा १३ जानेवारीपासून सुरू होणार आहे. या आगामी स्पर्धेसाठी मुंबई संघाची (mumbai ranji team) घोषणा करण्यात आली आहे. मुंबई क्रिकेट असोसीएशनने (MCA) बुधवारी (२९ डिसेंबर) त्यांच्या २० सदस्यांच्या संघाची घोषणा केली. परंतु, एमसीएने सांगितल्याप्रमाणे हा संघ पहिल्या दोन सामन्यांसाठी आहे. त्यानंतर यामध्ये बदल होण्यची शक्यता आहे. सर्वात चर्चेचा विषय ठरत आहे, तो म्हणजे या संघात भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा (sachin tendulkar) मुलगा अर्जुन तेंडुलकरला (arjun tendulkar) सामील केले गेले आहे.
मुंबई संघाला आगामी रणजी स्पर्थेत त्यांचा पहिला सामना महाराष्ट्र संघाविरुद्ध १३ ते १६ जानेवारी या काळात खेळायचा आहे. तर दुसरा सामना २० ते २३ जानेवारी दरम्यान दिल्ली संघाविरुद्ध खेळायचा आहे. या दोन सामन्यांमध्ये भारताचा यष्टीरक्षक फलंदाज पृथ्वी शॉ मुंबई संघाचे नेतृत्व करणार आहे. या सामन्यांसाठी अर्जुन तेंडुलकरला निवडले गेले आहे आणि तो त्याचे प्रथमश्रेणी पदार्पण करू शकतो. सचिन तेंडुलकर जागतिक क्रिकेटमधील महान फलंदाज होता. परंतु, त्याचा मुलगा एक वेगवान गोलंदाज आहे.
अर्जुन तेंडुलकरने यापूर्वी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये मुंबई संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. मात्र, रणजी क्रिकेटमध्ये त्याला पहिल्यांदाच संधी मिळाली आहे. अर्जुनला पहिल्या आणि दुसऱ्या सामन्यात संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये देखील सामील करण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी, अर्जुन आयपीएलच्या २०२१ हंगामात सहभागी झाला आहे. आयपीएल फ्रेंचायझी मुंबई इंडियन्सने अर्जुलला त्याची बेस प्राईस २० लाख रूपयांमध्ये खरेदी केले होते. मात्र, मुंबई इंडियन्ससाठी त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही.
अर्जुनव्यतिरिक्त एमसीएने इतर अनेक अनुभवी आणि गुणवंत खेळाडूंना मुंबईच्या रणजी संघात निवडले आहे. यामध्ये सलामीवीर फलंदाज यशस्वी जयस्वाल, मध्यक्रमातील फलंदाज सरफराज खान, अरमान जाफर, आकर्षित गोमेल आणि अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज आदित्य तरे यांना २० सदस्यीय संघात सामील केले गेले आहे. मुंबई संघाचा यापूर्वीचा रणजी ट्रॉफीतील इतिहास पाहिला, तर तो हैराण करणारा आहे. मुंबईने आतापर्यंत ४१ वेळा रणजी ट्रॉफी जिंकली आहे. आगामी हंगामात देखील संघ चांगले प्रदर्शन करण्याच्या प्रयत्नात असेल.
मुंबईचा रणजी ट्रॉफीसाठी निवडला गेलेला २० सदस्यीय संघ –
पृथ्वी शॉ (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, आकर्षित गोमेल, अरमान जाफर, सरफराज खान, सचिन यादव, आदित्य तरे (यष्टीरक्षक), हार्दिक तामोरे (यष्टीरक्षक), शिवम दुबे, अमन खान, शम्स मुलानी, तनुष कोटियन, प्रशांत सोलंकी, शशांक अटारडे, धवल कुलकर्णी, मोहित अवस्थी, प्रिंस बडियानी, सिद्धार्थ राउत, रोयस्टन डायस आणि अर्जुन तेंदुलकर.
महत्वाच्या बातम्या –
कोरोना संक्रमित गांगुलीच्या तब्येतीविषयी आली महत्त्वाची अपडेट; अशी आहे सद्यस्थिती
सलग दुसऱ्या विजयासह एटीके मोहन बागान ‘टॉप फोर’मध्ये
‘ये कव्हर ड्राईव्ह तुम्हे बर्बाद कर देगा विराट..’, कडवट शब्दात नेटकरी करतायेत ट्रोल
व्हिडिओ पाहा –