---Advertisement---

तो एक ट्विट रशीद खानला पडला भलताच महाग!

On: सोमवार, जून 11, 2018 3:20 PM
---Advertisement---

टी20 क्रिकेटमध्ये अव्वल स्थानी असणारा अफगाणिस्तानचा फिरकी गोलंदाज रशीद खान सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. नुकत्याच पार पडलेल्या अफगाणिस्तान विरुद्ध बांग्लादेश यांच्यातील टी 20 मालिकेतही रशीदची जबरदस्त गोलंदाजी पहायला मिळाली.

याबद्दल त्याचे सर्वांनी कौतुकही केले. यात भारताचे समालोचक हर्षा भोगलेंनीही रशीदचे कौतुक करणारे ट्विट केले होते. या ट्विटला रशीदने उत्तरही दिले. पण या उत्तरामुळे त्याला सोशल मिडीयावर चांगलेच ट्रोल करण्यात आले आहे.

झाले असे की 7 जूनला पार पडलेल्या तिसऱ्या आणि शेवटच्या टी20 सामन्यात अफगाणिस्तानने बांग्लादेश समोर 146 धावांचे अव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना अखेरच्या षटकात बांग्लादेशला 9 धावांची गरज होती. पण रशीदने उत्तम गोलंदाजी करत या षटकात 7च धावा दिल्या. यामुळे अफगाणिस्तानने हा सामना 1 धावेने जिंकला.

या विजयामुळे अफगाणिस्तानने बांग्लादेशला व्हाइटवॉश दिला. त्याबद्दल अफगाणिस्तानचे आणि रशीदचे अभिनंदन करण्यासाठी भोगले यांनी ट्विट केले की “रशीद खानने शेवटच्या षटकात 9 धावांचे रक्षण केल्याने अफगाणिस्तानने बांग्लादेशला व्हाइटवॉश दिला. अफगाणिस्तानसाठी चांगला निकाल होता. यामुळे रशीदच्या अभूतपूर्व विकासाचा पुरावा मिळाला.”

या ट्विटला उत्तर म्हणून रशीदने ट्विट केले की “थँक्यू ब्रो.” त्याने भोगले यांना ‘ब्रो’ म्हणजेच भाऊ असे म्हटल्याने त्याला ट्रोल करण्यात आले आहे.

काही ट्विटरकर्त्यांनी त्याला वयातील अंतर लक्षात घेण्यास सांगितले आहे. रशीद आणि भोगले यांच्यात जवळजवळ 37 वर्षांचे अंतर आहे.

https://twitter.com/Aditya_k168/status/1004985757084372992

तसेच या सगळ्या प्रकारानंतर भोगले यांनी ट्विट केला की “रशीद ब्रो म्हटल्याने मला काही प्रोब्लेम नाही. बेंगलोरमध्ये तूला खेळताना बघण्यास उत्सुक आहे.”

यावर रशीदने पून्हा ट्विट केले. मात्र यावेळेस त्याने भोगलेंना सर म्हटले.

14 जूनपासून बेंगलोरमध्ये भारत विरुद्ध अफगाणिस्तान संघात एकमेव कसोटी खेळण्यात येणार आहे. हा अफगाणिस्तानचा पहिलाच कसोटी सामना आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

आता पहा चक्क ५० रुपयांत कसोटी सामना!

ऐतिहासिक कसोटी सामन्यासाठी अफगाणिस्तान संघाचे बेंगलोर शहरात आगमन

भारताचा स्टार फुटबाॅलपटू लिओनेल मेस्सीला पडतोय भारी!

भारताचा युवा यष्टीरक्षक संजू सॅमसनला बीसीसीआयने दाखवला बाहेरचा रस्ता

-इंग्लंड-ऑस्ट्रेलिया एकदिवसीय मालिकेत डेव्हिड वार्नरकडे मोठी जबाबदारी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment