अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार राशिद खान दीर्घ कालावधीनंतर टी-20 फॉरमॅटमध्ये परतला आहे. दुखापतीमुळे तो बराच काळ संघाबाहेर होता. सध्या अफगाणिस्तान आणि आयर्लंड यांच्यात 3 सामन्यांची टी-20 मालिका खेळली जात आहे. मालिकेतील दुसरा सामना 17 मार्च रोजी म्हणजेच रविवारी शारजाह क्रिकेट मैदानावर खेळला गेला. अफगाणिस्ताननं या सामन्यात जोरदार पुनरागमन करत सामना 10 धावांनी जिंकला. यासह त्यांनी मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे.
या सामन्यात अफगाणिस्तानकडून स्टार खेळाडू राशिद खाननं जोरदार प्रदर्शन केलं. सामन्यात त्यानं बॅट आणि बॉलनं कहर केला. राशिद खाननं सामन्यात एक अप्रतिम षटकार मारला, ज्याचा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे.
बॅरी मॅकार्थी आयर्लंडसाठी अफगाणिस्तानच्या डावातील 18 वं षटक टाकत होता. षटकाच्या शेवटच्या चेंडूवर अफगाणिस्तानचा कर्णधार राशिद खान स्ट्राइकवर होता. मॅकार्थीनं राशिदला फुल टॉस चेंडू टाकला. या चेंडूवर राशिदनं डोकं खाली करून लेग साइडला उत्तुंग षटकार ठोकला. हा चेंडू सरळ स्टँड्समध्ये जाऊन पडला.
राशिद खानचा हा शॉट पाहून सगळेच थक्क झाले. षटकार मारल्यानंतर काही सेकंद राशिद खान त्याच पोजिशनमध्ये उभा राहिला. त्याच्या या शानदार षटकाराचा व्हिडिओ अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डानं सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओवर सोशल मीडिया युजर्स भरभरून प्रतिक्रिया देत आहेत.
We have seen that before! 😄
Just @RashidKhan_19 being Rashid Khan! 🤩👏🙌#AfghanAtalan | #AFGvIRE2024 pic.twitter.com/yxRqBibMQf
— Afghanistan Cricket Board (@ACBofficials) March 17, 2024
सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, अफगाणिस्ताननं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. संघानं निर्धारित 20 षटकांत 9 गडी गमावून 152 धावा केल्या. अनुभवी खेळाडू मोहम्मद नबी (59), सादिकुल्लाह अटल (35) आणि राशिद खान (25) यांनी संघासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. 153 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आयर्लंडचा संघ 8 विकेट्सवर 142 धावाच करू शकला. अशाप्रकारे त्यांचा 10 धावांनी पराभव झाला. आता मालिकेतील निर्णायक सामना 18 मार्च रोजी शारजाह येथे होणार आहे.
आगामी आयपीएल 2024 मध्ये राशिद खान गुजरात टायटन्सकडून खेळताना दिसेल. तो त्याच्या संघाचा मुख्य गोलंदाज आहे. संघाचं नेतृत्व युवा शुबमन गिलकडे आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
“कर्णधार बनल्यानंतर रोहित शर्माशी बोलला का?”, हार्दिक पांड्याचं उत्तर ऐकून बसेल धक्का!
आयपीएलचा सर्वात महागडा खेळाडू भारतात दाखल, तब्बल 9 वर्षांनी करतोय पुनरागमन!
IPL 2024 पूर्वी फार्मात आला गुजरात टायटन्सचा गोलंदाज, इतर संघांसाठी धोक्याची घंटा!