अफगाणिस्तानकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा राशिद खान हा सर्वोत्तम फिरकीपटू म्हणून नावारुपाला आला आहे. त्याने आपली एक वेगळी ओळख क्रिकेट जगतात बनवली आहे. सध्या तो इंडियन प्रीमीयर लीग २०२२ मध्ये खेळताना दिसत आहे. त्याने या स्पर्धेत दमदार कामगिरीही केली आहे. तो या आयपीएल हंगामात हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सकडून खेळत आहे.
दरम्यान, राशिदने नुकतेच त्याच्या ड्रीम हॅट्रिकबद्दल (Dream Hat-Trick) खुलासा केला आहे. त्याने हा खुलासा करताना भारत, पाकिस्तान आणि न्यूझीलंड संघाच्या फलंदाजांचा समावेश आहे. त्याने सांगितले की, विराट कोहली, बाबर आझम आणि केन विलियम्सन या तिघांच्या विकेट्स त्याला हॅट्रिकमध्ये घ्यायला आवडतील. त्याचबरोबर त्याला सर्वात कठीण फलंदाजांबद्दल विचारले असता, त्याने ख्रिस गेल, आंद्र रसेल आणि हार्दिक पंड्या यांची नावे घेतली.
राशिदने (Rashid Khan) आयपीएलमध्ये हार्दिक पंड्याच्या (Hardik Pandya) अनुपस्थितीत चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध गुजरात टायटन्स संघाचे नेतृत्व केले होते. त्यावेळी तो पहिल्यांदाच आयपीएलमध्ये कर्णधार बनला होता. या सामन्यात गुजरातने ३ विकेट्सने विजय मिळवला होता. या सामन्यात राशिदने गोलंदाजीत नाही पण फलंदाजीत चांगली कामगिरी केली होती. राशिदने फलंदाजी करताना २१ चेंडूत ४० धावा केल्या.
राशिद गेल्यावर्षीपर्यंत सनरायझर्स हैदराबादचा भाग होता. पण, त्याला आयपीएल २०२२ (IPL 2022) आधी हैदराबादने मुक्त केले. त्यामुळे त्याला गुजरातने १५ कोटी रुपयांची किंमत मोजत आपल्या संघात सामील करून घेतले. तसेच त्याच्याकडे गुजरात टायटन्सचे उपकर्णधारपद देखील सोपवण्यात आले.
राशिदने आत्तापर्यंत आयपीएलमध्ये ८३ सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने २०.७३ च्या सरासरीने आणि ६.३५ च्या इकोनॉमीने १०१ विकेट्स घेतल्या आहेत. त्याची १९ धावांत ३ विकेट्स ही सर्वोत्तम कामगिरी आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएल सुरू असतानाच एमएस धोनी का मागवतोय २ हजार कडकनाथ कोंबड्या? जाणून घ्या कारण
…आणि सचिनला अमिताभ बच्चन यांच्यासमोर व्हावे लागले होते खजील, वाचा ‘तो’ मजेदार किस्सा