---Advertisement---

व्वा! फिरकीच्या तालावर फलंदाजांना नाचवणारा राशिद खान झाला सिंगर, व्हिडिओ भन्नाट व्हायरल

On: बुधवार, जून 2, 2021 3:16 PM
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेत,बायो बबल भेदून कोरोनाने शिरकाव केल्याचे पाहायला मिळाले होते. त्यामुळे बीसीसीआयने आयपीएल स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे सर्वच खेळाडू आपल्या घरी परतले आहेत. तसेच सनरायझर्स हैदराबाद संघातील फिरकीचा जादूगर राशिद खान देखील आपल्या घरीच आहे. तो मिळालेल्या रिकाम्या वेळेचा आनंद घेताना दिसून येत आहे. राशिदचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.ज्यामध्ये तो पाकिस्तानी गाण्याचे बोल गुणगुणत आहे.

क्रिकेटच्या मैदानावर आपल्या फिरकीच्या जाळ्यात भल्या भल्या फलंदाजांना अडकवणाऱ्या रशिद गाणेही सुरेल म्हणत आहे.  यापूर्वीही त्याला अनेकदा बॉलिवुडचे गाणे बोलताना पहिले गेले आहे. २२ वर्षीय राशिदने आपल्या ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला होता.

ज्यामध्ये तो पाकिस्तानी सिरीयल ड्रामा, “तुम मेरे पास हो “हे गाणं गाताना दिसून येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ आताचा नसून, एक वर्ष जुना आहे. अनेकांनी त्याच्या या कौशल्याचे कौतुक केले आहे.

आयपीएल २०२१ स्पर्धा ४ मे रोजी अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली होती. या हंगामात सनरायझर्स हैदराबाद संघाला साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले होते.या संघाने एकूण ७ सामने खेळले होते. यामध्ये त्यांना अवघ्या १ सामन्यात विजय मिळवण्यात यश आले होते. या ७ सामन्यांमध्ये राशिद खानला १० गडी बाद करण्यात यश आले होते. तसेच त्याने आयपीएल कारकिर्दीत एकूण ६९ सामने खेळले आहेत. यात त्याला ८५ गडी बाद करण्यात यश आले आहे.

आयपीएल स्पर्धेतून घरी परतल्यानंतर,राशिद खानने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला होता. ज्यावर ड्वेन ब्रावोने दिलेली प्रतिक्रिया सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली होती. त्याने आपल्या घरातील एक फोटो पोस्ट केला होता. या फोटोतील आलिशान घर पाहून ड्वेन ब्रावो आश्चर्यचकित झाला होता. या फोटोवर कमेंट करत ड्वेन ब्रावोने विचारले होते की,” हे तुझे घर आहे की आलिशान हॉटेल.”

महत्त्वाच्या बातम्या – 

ज्या मुंबईतून क्रिकेटचे संस्कार झाले, त्याच मुंबई संघाचा ‘महागुरु’ बनलेल्या अमोल मुजुमदारचा प्रवास

इंग्लंडला मायदेशात कसोटीत पराभूत करण्यासाठी पुरुष संघाची मदत घेणार भारतीय महिला संघ?

अंडी खाण्यामुळे निशाण्यावर आलेल्या विराटने ट्रोल करणाऱ्यांना ‘असे’ दिले प्रतिउत्तर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---