टी-20 क्रिकेटमध्ये जागकतिक क्रमवारीत गोलंदाजीत अव्वल स्थानी असलेला आणि आयपीलचा सुपरहीरो ठरलेल्या रशिद खान विषयी गेल्या दोन महिन्यांपासून सुरू झालेल्या चर्चां थांबण्याची काही चिन्हें दिसेनात.
गुरूवारपासून सुरू झालेल्या एकमेव कसोटी सामन्यापूर्वी रशिद खानने भारतीय खेळाडूंसह प्रेक्षकांनाही चिंतेत टाकले होते.
या सामन्यापूर्वी भारतीय फलंदाजांना अफगानिस्तानच्या फिरकी गोलंदाजांची चिंता होती. परंतू काल सुरू झालेल्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी मात्र भारताचा सलामिवीर शिखर धवनसह सर्वच फलंदाजांनी रशिद खानची चांगलीच धुलाई केली.
पहिल्या दिवसाचा खेळ संपताना भारतीय संघाने दोन्ही सलामिवीर शिखर धवन आणि मुरली विजयच्या शतकाच्या जोरावर 6 बाद 347 धावसंख्या होती.
यामध्ये अफगानिस्तानकडून रशिद खानने 26 षटकात सर्वाधिक 120 धावा दिल्या आणि फक्त एकच बळी त्याला मिळवता आला.
हाच धागा पकडत सोशल नेटवर्कवर नेटकऱ्यांनी त्याला लक्ष करत जोरदार ट्रोल केले.
तसेच आज त्याच्या नावे एक नकोसा विक्रमही झाला. त्याने पहिल्या डावात गोलंदाजी करताना 34.5 षटकात 154 धावा दिल्या. कोणत्याही संघाच्या पदार्पणाच्या सामन्यात दिडशेपेक्षा जास्त धावा देणारा तो पहिला गोलंदाज ठरला आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
–ना सचिन, ना कपिल, ना धोनी… अशी कामगिरी केली आहे फक्त अफगाणिस्तानच्या खेळाडूंनी
–टाॅप ३- या भारतीय ओपनरने केली आहेत कसोटीत सर्वाधिक शतके