गुरुवारी (१४ एप्रिल) आयपीएलच्या मैदानात हंगामातील २४ वा सामना खेळला गेला. या सामन्यात गुजरात टायटन्स संघाने ३७ धावांनी राजस्थान रॉयल्सवर विजय मिळवला. राजस्थानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी केली. प्रथम फलंदाजी करताना गुजरात टायटन्सचा सलामीवीर फलंदाज मॅथ्यू वेड संघाला चांगली सुरुवात देऊ शकला नाही. राजस्थानच्या रस्सी वॅन डर ड्यूसेनने केलेल्या अप्रतिम थ्रोमुळे वेड अवघ्या १२ धावा करून तंबूत परतला.
गुजारत टायटन्स आणि राजस्थान रॉयल्समधील हा सामना मुंबईच्या डॉ. डी वाय पाटील स्पोर्ट्स ऍकेडमीमध्ये खेळला गेला. गुजरात टायटन्स जेव्हा फलंदाजीसाठी आला, तेव्हा पहिले षटक जेम्स नीशमने टाकले आणि १२ धावा खर्च केल्या. गुजरातचा सलामीवीर फलंदाज मॅथ्यू वेड (Matthew Wade) याने पहिल्याच षटकात तीन चौकार ठोकले. परंतु, जास्त वेळ तो खेळपट्टीवरच टिकू शकला नाही.
दुसऱ्या षटकात प्रसिद्ध कृष्णा गोलंदाजीसाठी आला. त्यावेळी शुभमन गिल स्ट्राईकवर होता. प्रसिद्धच्या षटकातील पहिल्या चेंडूवर गिल एकही धाव घेऊ शकला नाही. त्यानंतर दुसरा चेंडू गिलने कवर्सच्या दिशेने खेळला. अशात नॉन स्ट्राईकवरील वेड गिलने चेंडू मारल्यानंतर क्रिज सोडून पुढे निघाला. यादरम्यान क्षेत्ररक्षण करणाऱ्या रस्सी वॅन डर ड्यूसेन (Rassie Van Der Dussen) याने एक अप्रितम थ्रो केला आणि स्टंप उडवले. परिणामी वेडला अवघ्या १२ धावांवर समाधान मानत तंबूत परतावे लागले.
https://twitter.com/JamesTyler_99/status/1514612015582822406
WATCH – Van der Dussen's bullseye throw to run-out Wade 🎯👌
📽️📽️https://t.co/3uNf74YCYJ #TATAIPL #RRvGT
— IndianPremierLeague (@IPL) April 14, 2022
दरम्यान, उभय संघातील या सामन्याचा एकंदरित विचार केला, तर प्रथम फलंदाजी करताना गुजरात टायटन्ससाठी हार्दिक पंड्याने कर्णधारपदाला साजेशी खेळी केली. हार्दिकने ५२ चेंडूत ८७ धावा केल्या, तर दुसरीकडे राजस्थानसाठी सलामीवीर फलंदाज जोस बटलरने २४ चेंडूत सर्वाधिक ५४ धावा केल्या.
गुजरातने मर्यादित २० षटकात ४ विकेट्सच्या नुकसानावर १९२ धावा केल्या. प्रत्युत्तरात राजस्थान संघ २० षटाकत ९ विकेट्सच्या नुकसानावर १५५ धावा करू शकला. या विजयानंतर गुजरात टायटन्स गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर पोहोचला, तर राजस्थान रॉयल्स तिसऱ्या क्रमांकावर आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
IPL 2022| केव्हा आणि कुठे पाहाल हैदराबाद वि. कोलकाता सामना, कसे असेल हवामान; जाणून घ्या सर्वकाही
एसपी गोसावी मेमोरियल पुणे आंतरक्लब टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत टेनिसनट्स संघाचा सलग दुसरा विजय
…आणि जयसुर्याने भारताच्या सर्वात महत्त्वाच्या क्रिकेटरचे करियर अक्षरश: संपवले