आगामी आशिया चषक स्पर्धा 30 ऑगस्ट रोजी सुरू होणार आहे. पाकिस्तान आणि श्रीलंकेमध्ये आशिया चषक खेळला जाणार असून संघ तयारी करत आहेत. भारतीय संघ मात्र अद्यावर निश्चित झाला नाहीये. मागच्या काही महिन्यांपासून संघात मोठे फेरबदल झाले आहेत. तर वरिष्ठ खेळाडू दुखापतीमुळे मैदानातून बाहेर आहेत. अशातच संघ निवडणे सोपे दिसत नाही. याच पार्श्वभूमीवर भारताचे माजी दिग्गज रवी शास्त्री, संदीप पाटील आणि एमएसके प्रसाद यांनी आशिया चषकासाठी भारतीय संघाची निवड केली आहे.
रवी शास्त्री (Ravi Shastri), संदीप पाटील (Sandeep Patil) आणि एमएसके प्रसाद (MSK Prasad) यांनी निवडलेल्या भारतीय संघात काही प्रमुख खेळाडूंना घेतले गेले नाहीये. सर्वात चर्चेत आहे ती तिलक वर्मा (Tilak Verma) याची संघात झालेली निवड. रवी शास्त्रींनी तिलकला चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी या संघात सामील केले आहे. पण यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसन (Sanju Samson) या 15 सदस्यीय संघात जागा बनवू शकला नाही. सॅमसन नुकत्याच पार पडलेल्या वेस्ट इंडीज दौऱ्यात अपेक्षित कामगिरी करू शकला नव्हता. यशस्वी जयस्वाल याला मात्र या संघात निवडले गेले नाहीये.
सोबतच केएल राहुल (KL Rahul) आणि श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) यांची निवड या तिन्ही दिग्गजांनी केली नाही. राहुल आणि अय्यर मागच्या मोठ्या काळापासून दुखापतीमुळे क्रिकेट खेळताना दिसले नाहीत. काही महिन्यांपासून बेंगलोरच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत त्यांनी फिटनेसवर काम केले आहे. नुकतेच सराव सामन्याती या खेळाडूंचा व्हिडिओ देखील समोर आले होते. असे असले तरी, आगामी आशिया चषकापूर्वी खेळाडूंसाठी संघात पुनरागमन वाटते तितके सोपे नसेल. यासाठी त्यांना फिटनेस चाचणी पास करावी लागेलच. पण त्यांचा फॉर्म देखील चांगला हवा असेल. (Ravi Shastri, Sandeep Patil and MSK Prasad pick squad for Asia Cup.)
रवि शास्त्री, संदीप पाटिल आणि एमएसके प्रसाद यांनी आशिया चषकासाठी निवडेलेला भारतीय संघ –
शुभमन गिल, ईशान किशन, विराट कोहली, रोहित शर्मा, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकुर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज और जसप्रीत बुमराह
महत्वाच्या बातम्या –
दिग्गजाने समोर ठेवली सॅमसनची संपूर्ण कारकीर्द! म्हणाला, “आयपीएल बाजूला केली तर…”
कमिन्स होणार निवृत्त? वनडे विश्वचषकाआधी ऑस्ट्रेलियन कर्णधाराचे मोठे वक्तव्य