भारतीय संघात मागच्या काही महिन्यांमध्ये अनेक बदल झाल्याचे पाहायला मिळाले. यादरम्यान संघाच्या कर्णधारपदावरून देखील अनेक वाद झाले. आयसीसी टी-२० विश्वचषकानंतर विराट कोहली (virat kohli) याने टी-२० संघाचे कर्णधारपद सोडले. त्यानंतर त्याच्याकडून एकदिवसीय संघाचे कर्णधारपद देखील काढून घेण्यात आले. सध्या भारताचा टी-२० आणि एकदिवसीय संघाचे कर्णधारपद रोहित शर्माकडे आहे.
अशात भारतीय संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (ravi shastri) यांनी दोन खेळाडूंची नावे घेतली आहेत, जे रोहितनंतर भविष्यात भारतीय संघाचे कर्णधार बनू शकतात.
रवी शास्त्रींनी त्या दोन खेळाडूंची नावे सांगितली, जे भविष्यात भारतीय संघाच्या कर्णधारपदासाठी प्रमुख दावेदार असतील. शास्त्री बोलले की, “राहुल द्रविडला त्यांचे काम कसे करायचे हे माहीत आहे. मला फक्त एवढे म्हणायचे आहे की, या कामाचा आनंद घ्या. केएल राहुल आहे, श्रेयस अय्यरमध्येही संघाचे नेतृत्व करण्याचे चांगले गुण आहेत. हे विशेषतः मर्यादित षटकांच्या स्वरुपांमध्ये खूप चांगले आहेत.”
रोहितला मर्यादित षटाकांच्या संघाचा कर्णधार बनवण्याविषयी शास्त्री म्हणाले, “हे पाहा, एकदा जर विराटने हे स्पष्ट केले आहे की, तो आता टी-२० स्वरुपामध्ये संघाचे नेतृत्व करू इच्छित नाही, तर रोहित शर्मा या पदावर येणे आपोआप स्पष्ट झाले होते. ही गोष्टी जगजाहीर झाली होती की, तो मर्यादित षटकांच्या स्वरुपांमध्ये संघाचे नेतृत्व करेल.”
हेही वाचा- शास्त्री गुरूजी म्हणतायेत, “सट्टेबाजी कायदेशीर करा”
दरम्यान, नुकत्याच पार पडलेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतून अय्यरने भारतीय संघासाठी कसोटी पदार्पण केले होते. टी-२० आणि एकदिवसीयमध्ये त्याने यापूर्वीच पदार्पण केले आहे आणि आतापर्यंतची त्याची कारकीर्द चांगली राहिली आहे. त्याला संघाचे नेतृत्व करण्याचा देखील अनुभव आहे. आयपीएलमध्ये त्याने दिल्ली कॅपिटल्स संघाचे कर्णधारपद सांभाळलेले आहे. तो २०१९ ते आयपीएल २०२१ च्या पहिल्या टप्प्यापर्यंत दिल्ली कॅपिटल्स संघाचे नेतृत्व करत होता. दरम्याच्या काळात दुखापतीमुळे तो विश्रांतीवर होता आणि याच कारणास्तव त्याच्याकडून कर्णधारपद देखील गेले.
तसेच केएल राहुलच्या कारकिर्दीचा विचार केला, तर ती देखील अप्रतिम राहिली आहे. राहुलने त्याची आयपीएल फ्रेंचायझी पंजाब किंग्जने नेतृत्व केले आहे.
महत्वाच्या बातम्या –
धक्कादायक! पिंपरी चिंचवडवडमधील पैलवानाचा अंदाधुंद गोळीबारात मृत्यू, धडाधड झाडल्या ८ गोळ्या
‘अश्विन श्रीलंकेत जन्मला असता तर…’, आइसलंड क्रिकेटचे गमतीशीर ट्वीट सोशल मीडियावर ठरतेय चर्चेचा विषय
…आणि सचिनचा कसोटी क्रिकेटमधील सर्वाधिक धावांचा विक्रम मोडण्याची संधी कूकने दवडली !!!
व्हिडिओ पाहा –