---Advertisement---

आर अश्विन-डॅनिएल वॅटमध्ये ट्विटरवर रंगलेल्या गमतीशीर संभाषणाने वेधले क्रिकेट चाहत्यांचे लक्ष

On: शुक्रवार, जुलै 16, 2021 12:05 AM
---Advertisement---

मैदानात जरी विविध देशांचे खेळाडू एकमेकांसमोर प्रतिस्पर्धी म्हणून उभे राहात असले, तरी मैदानाबाहेर अनेकदा त्यांची चांगली मैत्री असल्याचे दिसते. तसेच अनेक क्रिकेटपटू सोशल मीडियावर एकमेकांच्या पोस्टवर कमेंट करतानाही दिसतात. नुकतेच भारताचा दिग्गज फिरकीपटू आर अश्विन आणि इंग्लंडची महिला फलंदाज डॅनिएल वॅट यांच्यातील ट्विटरवरील संभाषणाने अनेक क्रिकेट चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.

अश्विन-वॅटमध्ये गमतीशीर संभाषण 
बुधवारी (१५ जुलै) इंग्लंड महिला विरुद्ध भारतीय महिला संघात टी२० मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना पार पडला. या सामन्यात इंग्लंडने ८ विकेट्सने विजय मिळवत मालिका २-१ अशा फरकाने जिंकली. इंग्लंडच्या या विजयात डॅनिएल वॅटने महत्त्वपूर्ण वाटा उचलला. तिने इंग्लंडकडून भारताने दिलेल्या १५४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना  ५६ चेंडूत १२ चौकार आणि १ षटकारासह ८९ धावांची खेळी केली.

तिच्या या खेळीचे आर अश्विनने कौतुक केले. त्याने ट्विट केले की ‘डॅनी वॅटने मस्त खेळी केली. मालिका विजयाबद्दल इंग्लंडचे कौतुक. भारतीय संघही संपूर्ण मालिकेत तितकाच प्रतिभाशाली दिसला.’

अश्विनच्या या ट्विटला वॅटने काहीसे गमतीशीर उत्तर देताना लिहिले की ‘धन्यवाद अश्विन. क्रिकेटमधील दिग्गजाकडून कौतुक झाल्याने छान वाटत आहे. आमच्या संघाविरुद्धच्या मालिकेसाठी शुभेच्छा, पण खूप चांगली कामगिरीही नको.’

भारतीय पुरुष कसोटी संघाला ४ ऑगस्टपासून इंग्लंडविरुद्ध ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे.

वॅटच्या या ट्विटवर पुन्हा अश्विनने उत्तर दिले. त्याने हसण्याच्या आणि इतर इमोजींसह लिहिले की ‘धन्यवाद आणि न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी तुलाही शुभेच्छा.’ या ट्विटला पुन्हा एकदा प्रतिउत्तर देताना वॅटने अश्विनचे आभार मानले.

इंग्लंड महिला संघाला न्यूझीलंड महिला संघाविरुद्ध सप्टेंबरमध्ये मर्यादीत षटकांच्या मालिका खेळायच्या आहेत. (Ravichandran Ashwin and Danielle Wyatt’s conversation on Twitter)

अश्विनची काउंटी सामन्यांत चमकदार कामगिरी 
अश्विन इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका खेळण्यापूर्वी सरे संघाकडून सोमरसेटविरुद्ध काउंटी चॅम्पियनशीपचा सामना खेळला. या सामन्यात त्याने ६ विकेट्स घेतल्या. आता अश्विन भारतीय संघाकडून २० ते २२ जुलैदरम्यान होणाऱ्या सराव सामन्यात खेळताना दिसेल. त्यानंतर इंग्लंड विरुद्ध भारत संघात ४ ऑगस्टपासून ५ सामन्यांची कसोटी मालिका सुरु होईल.

महत्त्वाच्या बातम्या – 

भारताविरुद्ध सराव सामना खेळण्यासाठी काउंटी इलेव्हन सज्ज, ‘या’ १४ खेळाडूंची संघात निवड

‘कुल-चा’ जोडी एकत्र म्हणजे मजामस्तीची खात्री! विराट, धोनीची नक्कल करतानाचा व्हिडिओ व्हायरल

भारतीय संघात कोरोनाचा शिरकाव! थ्रोडाऊन स्पेशालिस्ट कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने २ खेळाडूंसह गोलंदाजी प्रशिक्षक क्वारंटाईन

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---