भारत आणि श्रीलंका (Ind vs SL Test Series) यांच्यातील पहिला कसोटी सामना मोहालीमध्ये खेळला गेला. पहिल्या डावात भारताने ५७४ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात श्रीलंका संघ अवघ्या १७४ धावांवर सर्वबाद झाला. पहिल्या डावात रवींद्र जडेजाने भारतीय संघासाठी जबरदस्त प्रदर्शन केले आणि संघाला ४०० धावांची आघाडी मिळवून दिली. रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) भारतीय संघाच्या डावखुऱ्या फिरकी गोलंदाजांमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणारा खेळाडू ठरला आहे.
रवींद्र जडेजाने पहिल्या डावात भारतासाठी नाबाद १७५ धावा केल्या. तर गोलंदाजी करताना त्याने ५ विकेट्स घेतल्या. या कामगिरीनंतर भारतीय संघाने मोठी आघाडी घेतली आणि श्रीलंका संघाला फॉलो ऑन (पुन्हा फलंदाजी) करण्याची संधी दिली. मायदेशात खेळताना कसोटी सामन्याच्या एका डावात सर्वाधिक वेळा ५ विकेट्स घेण्याच्या बाबतीत रविंद्र जडेजाने भारतासाठी सर्वोत्तम कामगिरी केली आहे.
भारतीय संघासाठी मायदेशात खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक वेळा ५ विकेट्स घेणाऱ्या डावखुऱ्या फिरकीपटूंमध्ये रवींद्र जडेजाने माजी दिग्गज बिशन सिंग बेदी यांची बरोबरी केली. बिशन सिंग यांनी भारतासाठी मायदेशात कसोटी खेळताना ८ वेळा एका डावात पाच विकेट्स घेतल्या आहेत. रविंद्र जडेजा आता त्यांच्या बरोबरीला आला आहे आणि त्यानेही ही कामगिरी ८ वेळा केली. प्रज्ञान ओझा तिसरा डावखुरा फिरकी गोलंदाज आहे, ज्याने भारतासाठी मायदेशातील कसोटी सामन्यांमध्ये ७ वेळा पाच विकेट्स हॉल घेतला आहे.
दरम्यान, उभय संघातील या पहिल्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या डावात भारताने ४०० धावांची आघाडी घेतली आहे. श्रीलंकेसाठी पहिल्या डावात पाथम निसंका (६१) हा एकमेव खेळाडू होता, ज्याने अर्धशतकी खेळी केली. भारतासाठी जडेजाव्यतिरिक्त रिषभ पंतने ९६ धावांचे महत्वाचे योगदान दिले. गोलंदाजांमध्ये जडेजाच्या पाच विकेट्स सोडल्या, तर रविचंद्र अश्विन आणि जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. तसेच मोहम्मद शमीने एक विकेट घेतली
महत्वाच्या बातम्या –
भारीच! स्नेह राणा-पुजा वस्त्राकर जोडीची पाकिस्तानविरुद्ध कमाल, एकाच वेळी दोन विश्वविक्रम नावावर
जडेजाच्या २०० धावा पूर्ण न होण्याला जबाबदार कोण? सचिनचा किस्सा आठवत चाहते म्हणाले…