विश्वचषक 2023 स्पर्धेच्या अखेरच्या साखळी सामन्यात रविवारी (दि. 12 नोव्हेंबर) भारतीय संघाने नेदरलँड्सची दाणादाण उडवली. दक्षिण आफ्रिकेसारख्या संघाला पराभूत करत मोठा उलटफेर करणाऱ्या नेदरलँड्सला भारताने या सामन्यात 160 धावांनी पराभवाचा धक्का दिला. अशाप्रकारे भारताने साखळी फेरीतील 9 पैकी 9 सामन्यात विजय मिळवला. विशेष म्हणजे, भारताने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना 410 धावांचा डोंगर उभा केला होता. हे आव्हान पार करणे नेदरलँड्ससाठी कठीण होते. अशात विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी गोलंदाजीत हात आजमावला. महत्त्वाचं म्हणजे, त्यांना विकेटही मिळाली.
रोहित शर्माचा कारनामा
रोहित शर्मा याने नेदरलँड्सच्या डावाची शेवट केला. त्याने 48वे षटक टाकताना पाचव्या चेंडूवर नेदरलँड्सचा एकमेव अर्धशतकवीर तेजा निदामानुरू याची विकेट घेतली. तेजाने सामन्यात 39 चेंडूत 1 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीने 54 धावा केल्या. खरं तर, रोहितने यावेळी विकेट घेत खास कारनामा केला. त्याने वनडे क्रिकेटमध्ये 7 वर्षांनंतर गोलंदाजी केली. तसेच, त्याला एक दशकाहूनही जास्त काळानंतर विकेट घेण्यात यश आले. वनडे क्रिकेटमध्ये त्याने 9 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच, 27 धावा खर्चून 2 विकेट्स ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.
रोहित आणि विराटच नाही, तर ‘यांनी’ही केली गोलंदाजी
नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माने 5 चेंडू टाकत 7 धावा खर्च केल्या आणि 1 विकेट घेतली. चौथ्या चेंडूवर तेजाने षटकार मारला होता. मात्र, पुढच्याच चेंडूवर मोठा शॉट मारण्याचा प्रयत्न केला, पण लाँग ऑनवर मोहम्मद शमी याने त्याचा झेल पकडला. यादरम्यानचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. रोहितपूर्वी विराट कोहली यानेही गोलंदाजी केली. त्याने 3 षटके गोलंदाजी करताना 13 धावा खर्चून 1 विकेट घेतली. याव्यतिरिक्त शुबमन गिलने 2 षटकात 11 धावा खर्च केल्या. तसेच, सूर्यकुमार यादव यानेही 2 षटकात 17 धावा लुटवल्या.
Rohit Sharma's bowling today against Netherlands#RohitSharmahttps://t.co/DhGy1DIpi0
— Krishna♡ (@LVRxKRISH_45) November 12, 2023
रोहितने 2016नंतर केली गोलंदाजी
रोहित शर्मा याने नेदरलँड्सविरुद्ध गोलंदाजी करण्यापूर्वी 7 वर्षांपूर्वी म्हणजेच 12 जानेवारी, 2016 रोजी पर्थ येथे खेळताना ऑस्ट्रेलियाविरुद्ध 1 षटक गोलंदाजी केली होती. त्याच्या षटकात 11 धावा बनल्या होत्या. नेदरलँड्सपूर्वी त्याने 19 फेब्रुवारी, 2012 रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध ब्रिस्बेनमध्ये विकेट घेतली होती. (record rohit sharma bowling wickets record in odi ind vs ned world cup)
हेही वाचा-
गरज नसताना गोलंदाजांनी कशाला टाकले वाईड यॉर्कर? सामन्यानंतर रोहितचा सर्वात मोठा खुलासा, वाचा प्लॅन
9 पैकी 9 विजय मिळवल्यानंतर बोलला रोहित, म्हणाला, “वर्ल्डकप सुरू झाला तेव्हापासूनच…”