टीम इंडियाचा स्टार फलंदाज रिषभ पंतसाठी आजचा दिवस खूप खास आहे. त्याचा जन्म आजच्या दिवशी (4 ऑक्टोबर) 1997 मध्ये उत्तराखंड येथे झाला. रिषभने वयाच्या 12व्या वर्षी क्रिकेट खेळायला सुरुवात केली. तो आपल्या आईसोबत दिल्लीला आला आणि सोनेट क्रिकेट अकादमीत प्रवेश घेतला. जेव्हा तो पहिल्यांदा दिल्लीला आला तेव्हा त्याने आईसोबत गुरुद्वारामध्ये रात्र काढली.
कठोर परिश्रमानंतर रिषभ पंतने 22 ऑक्टोबर 2015 रोजी रणजी ट्रॉफीच्या प्रथम श्रेणी सामन्यात पदार्पण केले. यानंतर त्याने पुढच्या महिन्यात 2015-16 विजय हजारे ट्रॉफीमध्ये लिस्ट ए मध्ये पदार्पण केले. 2016-17 रणजी ट्रॉफीमध्ये महाराष्ट्राविरुद्ध सामना खेळताना पंतने एका डावात 308 धावा केल्या होत्या. प्रथम श्रेणी सामन्यात त्रिशतक झळकावणारा तो तिसरा सर्वात तरुण भारतीय ठरला. यानंतर तो लोकांमध्ये चर्चेचा विषय बनला होता.
ज्या दिवशी पंतने 2016 अंडर-19 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारतीय अंडर-19 संघासाठी शतक झळकावले. त्याच दिवशी पंतला इंडियन प्रीमियर लीगमध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्सने विकत घेतले. दिल्लीने 1.9 कोटी रुपये देऊन पंतला प्रथमच संघात स्थान दिले. मात्र, आयपीएलच्या पदार्पणाच्या मोसमात तो विशेष काही करू शकला नाही. पण 2017 मध्ये पंतचे वादळ आले. जेव्हा त्याने 14 डावात एकूण 366 धावा केल्या होत्या.
रिषभ पंतच्या करिअरवर थोडक्यात उजाळा
– टी20 विश्वचषक विजेता
– ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका मध्ये कसोटी शतक
– इंग्लंडमध्ये कसोटी आणि एकदिवसीय शतक
– गाबा कसोटीचा नायक
– कसोटीत भारताकडून सर्वात जलद अर्धशतक
– कसोटीत भारतीय यष्टीरक्षक म्हणून सर्वाधिक संयुक्त शतके
– T20 WC winner
– Test hundred in AUS & in SA
– Test & ODI hundred in ENG
– The hero of Gabba
– Fastest fifty by an Indian in Tests
– Joint most hundreds by an Indian WK in TestsHappy birthday Rishabh Pant – one of the best players in this generation 🇮🇳 pic.twitter.com/CmQ5UwUofN
— Johns. (@CricCrazyJohns) October 4, 2024
रिषभ पंतला 2017 मध्ये पहिल्यांदा भारताविरुद्ध पदार्पण करण्याची संधी मिळाली. त्याने इंग्लंडविरुद्धच्या टी-20 सामन्यात पदार्पण केले. पहिल्या सामन्यात त्याने 3 चेंडूत 5 धावा केल्यानंतर नाबाद राहिला. पंतने पदार्पणानंतर सातत्याने चांगली खेळी खेळली. यामुळे तो आज संघाला आवश्यक असलेल्या खेळाडूंपैकी एक आहे. अलीकडेच पंतने बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत अप्रतिम शतक झळकावले होते.
रिषभ पंतच्या एकूण करिअरबाबत बोलायचे झाल्यास त्याने आतापर्यंत 35 कसोटी, 31 वनडे आणि 76 टी20 सामन्यांमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केला आहे. 60 कसोटी डावात त्याने 2432 धावा केल्या आहेत, तर वनडे मध्ये 871 धावा केल्या असून उर्वरीत 76 टी20 सामन्यात 1209 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये 3 अर्धशतकांचा सामवेश आहे.
हेही वाचा-
नीरज चोप्राला सुपरस्टार बनवणाऱ्या प्रशिक्षकाने पदभार सोडले, जाणून घ्या कारण
टीम इंडिया ॲक्शनमध्ये, स्पर्धेतील पहिली लढत न्यूझीलंडशी, या ठिकाणी पाहा लाईव्ह सामना
मॅच जिंकताच संपूर्ण संघ भावूक; बांग्लादेशला दशकानंतर महिला टी20 विश्वचषकात विजय मिळाला