भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी हा नेतृत्त्व आणि फलंदाजी बरोबर यष्टीमागे फिरकीपटूंना सल्ला देण्यासाठी ओळखला जातो. बऱ्याचदा त्याचे हे बोलणे यष्टीच्या माईकमध्ये कैद होत असायचे. असेच काहीसे यष्टीरक्षक रिषभ पंत देखील करताना दिसत आहे. चेन्नईत चालू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडची फलंदाजी खास राहिली नाही. परंतु यावेळी पंतने यष्टीमागून चाहत्यांचे चांगलेच मनोरंजन केले.
इंग्लंडचा पहिला डाव चालू असताना पंत यष्टीच्या मागे उभे राहून तो गोलंदाजांना सल्ला देत होता. अशात इंग्लंडचा डॅनियल लॉरेन्स आणि बेन स्टोक्स फलंदाजी करत असताना अक्षर एक षटक टाकण्यासाठी आला. त्याच्या गोलंदाजीवेळी पंतने गंमतीने त्याला म्हटले की, “याच्या तोंडावर सुद्धा टाकू शकतो.” अर्थात पंत अक्षरला सांगत होता की, तू लॉरेन्सच्या तोंडावर देखील चेंडू टाकू शकतोस.
पंतचा हाच आवाज यष्टीच्या माईक मध्ये कैद झाला. ऑस्ट्रेलियामधे यष्टीच्या मागे पंतने ‘स्पायडरमॅन-स्पायडरमॅन’ गाणे म्हटले होते. तेव्हापासून लोक पंतच्या अशा मजेशीर भाष्यांचे दिवाने झाले आहेत. त्यामुळे इंग्लंडच्या विरोधात त्याने अक्षरला म्हटलेल्या मजेशीर भाष्यालाही लोकांनी खूपच पसंती दर्शविली आहे.
Epic stump mic Of Kohli & Pant #ViratKohli #RishabhPant #INDvsENG #INDvENG #TeamIndia pic.twitter.com/WIBaoy7PXz
— Team India 🇮🇳 (@MiddleStumpIND) February 14, 2021
आर अश्विनकडून इंग्लंडला धक्के
आर अश्विनने इंग्लंडच्या पहिल्या डावात अप्रतिम कामगिरी केली. आपल्या गोलंदाजीच्या जोरावर चांगली कामगिरी करत त्याने आपल्या कारकिर्दीतील तेविसाव्या वेळी पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे. यात त्याने जेम्स अँडरसनला देखील मागे सोडले. डाव्या हाताचा हा गोलंदाज क्रिकेटच्या इतिहासातील २०० बळी घेणारा पहिला गोलंदाज ठरला. स्टुअर्ट ब्रॉडला बाद केल्यानंतर हा विक्रम त्याच्या नावावर झाला. त्यानंतर बेन स्टोक्सला देखील त्याने १८ धावात बाद केले. तत्पूर्वी पहिल्या डावात ३२९ धावा काढत भारताचे खेळाडू सर्वबाद झाले होते.
रिषभ पंतची कारकिर्द
रिषभने आपल्या कारकिर्दीत १८ कसोटी सामने खेळले असून १२५६ धावा काढल्या आहेत. याव्यतिरिक्त १६ एकदिवसीय आणि २७ टी२० सामन्यात त्याने अनुक्रमे ३७४ आणि ४१० इतक्या धावा काढल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
…अन् बेन स्टोक्स रागाने झाला लालबुंद, हेल्मेट जमिनीवर आदळलं आणि केलं असं काही
‘चाॅंद तारे फुल शबनम, तुम से अच्छा कौन हैं’; अश्निनचं धमाकेदार शतक आणि सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस