भारताचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत हा डावखुरा असल्यामुळे त्याला सॅमसनपेक्षा जास्त प्राधान्य दिले जाते, असे भारताचा यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसनचे प्रशिक्षक बीजू जॉर्ज यांनी म्हटले आहे. २०१५ साली हरारे येथील झिम्बाब्वेविरुद्धच्या टी२० सामन्यातून सॅमसनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यावेळी त्याने भारताकडून फक्त १ टी२० सामना खेळला. पुढे ४ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर २०१९मध्ये बांग्लादेशविरुद्धच्या सामन्यातून सॅमसनने भारतीय संघात पुनरागमन केले. परंतु, त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळली नाही. Rishabh Pant Gets More Chances Because He Is Lest Handed Said Biju George
याविषयी बोलताना सॅमसनचे प्रशिक्षक जॉर्ज म्हणाले की, “जर मला संजूच्या सर्वात जवळच्या व्यक्तीच्या दृष्टीकोनातून विचारले, तर त्याला संधी मिळायला पाहिजे. पण जर भारतीय संघाच्या दृष्टीकोनातून पाहिले, तर ते रिषभ पंतला का इतक्या संधी देत आहेत? एक म्हणजे, तो डावखुरा फलंदाज आहे. दूसरे म्हणजे, भारतीय संघाच्या तांत्रिक पद्धतीमुळे. त्यांनी विश्वचषकात विरुद्ध संघातील डावखुऱ्या फिरकीपटू किंवा वेगवान गोलंदाजांना लक्षात घेऊन खेळाडूंची निवड केली असावी. कारण, अशावेळी डावखुरा पंत उपयोगी ठरू शकतो.”
जॉर्ज पुढे बोलताना म्हणाले की, “हे केवळ माझे विचार आहेत. पण निर्णय भारतीय संघाचे प्रशिक्षक, कर्णधार आणि संघ व्यवस्थापकाचे आहेत. पण मुख्य निवडकर्त्याला निवडावे लागेल की, कोणत्या संघाविरुद्ध कोण खेळेल? पंत का संजू. असे नाहीये की ते मुद्दाम एखाद्या खेळाडूला संधी देत नाहीत.”
सॅमसनच्या फलंदाजीविषयी बोलताना जॉर्ज म्हणाले की, “संजू असा मुलगा आहे, ज्याची फलंदाजी वेळेवर निर्भर करते. तो असा खेळाडू नाही, जो चेंडूचा वेग पाहून त्याला हिट करेल. तो योग्य वेळ पाहून चेंडूला हिट करेल. संजूची हीच गोष्ट त्याला सर्वांपेक्षा वेगळा बनवते. जर त्याच्या आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटमधील खेळी पाहिल्या, तर संजू योग्य वेळेला चेंडूला हीट करताना दिसतो. गतवर्षी त्याने सनरायजर्स हैद्राबादविरुद्ध शतक केले होते. त्यावेळी त्याने कव्हर्सच्या बाजूला सगळे शॉट मारले होते. जेव्हा तो भारतीय संघात पहिल्यांदा आला तेव्हा त्याला कोणीतरी म्हटले की, तुला चेंडूला हिट करावे लागेल आणि त्याने चेंडूला हीट करायला सुरुवात केली. परिणामत: त्याचा फॉर्म गडबडला.”
महत्त्वाच्या बातम्या –
-आयपीएल २०२०: यंदा आयपीएल भारताबाहेर होणार म्हणून ‘या’ खेळाडूने व्यक्त केली निराशा
-VIDEO: दिल्ली कॅपिटल्सचा ‘गब्बर’ धवन ने सुरू केला मैदानी सराव
-राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार निवड समितीमध्ये झाली ‘या’ माजी भारतीय क्रिकेटपटूची निवड
ट्रेंडिंग लेख –
-क्रिकेटवर बनलेल्या या २ जबरदस्त बॉलिवूड चित्रपटांना दुर्लक्ष करुन चालणार नाही
-आयपीएल २०२०: ‘या’ ३ कारणांमुळे विराटचा आरसीबी संघ यंदा जिंकू शकतो आयपीएल ट्रॉफी