शुक्रवारी (दि. २२ एप्रिल) आयपीएल २०२२मधील ३४वा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात झाला. सामन्याच्या शेवटच्या षटकात नो बॉल हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. पंच नितीन मेनन यांनी दिल्लीच्या डावाच्या शेवटच्या षटकातील फुलटॉस असलेला तिसरा चेंडू नो बॉल दिला नाही. त्यानंतर डगआऊटमध्ये बसलेला रिषभ पंत चिडलेला दिसला. यानंतर सोशल मीडियावर एकच चर्चा रंगली. एकीकडे अनेकांनी पंतची ही रिऍक्शन योग्य असल्याचे सांगितले, तर काही आजी-माजी क्रिकेटपटूंनी या कृतीला खिलाडूवृत्तीच्या विरोधात असल्याचे म्हणले आहे. अशात या वादविवादादरम्यान बेंगलोरचा दिग्गज फलंदाज ग्लेन मॅक्सवेलनेही यावर प्रतिक्रिया देत आपले मत मांडले आहे.
ग्लेन मॅक्सवेलची प्रतिक्रिया
खरं तर ग्लेन मॅक्सवेलने (Glenn Maxwell) रिषभ पंतचा (Rishabh Pant) व्यवहार आणि पंचांच्या निर्णयाबद्दल एक मीम शेअर केले आहे. यासोबत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, “पंच प्रत्येक चेंडूवर फ्रंट फुटसाठी नो बॉल चेक करतात. मात्र, फुल टॉस चेक करू शकत नाहीत? काही लॉजिक आहे का?”
So umpires check no balls for front foot every ball, but can’t check a high full toss? Makes sense… pic.twitter.com/RUOX3Yh3YF
— Glenn Maxwell (@Gmaxi_32) April 22, 2022
दुसरीकडे समालोचनादरम्यान इंग्लंडचा माजी खेळाडू केविन पीटरसनने पंतच्या व्यवहारावर खंत व्यक्त केली आहे. पीटरसन म्हणाला की, “हे क्रिकेट आहे, फुटबॉल नाही. तुम्ही असं करू शकत नाही.” पीटरसन पुढे बोलताना म्हणाला की, “मला नाही वाटत की, जर रिकी पाँटिंग आज असता, तर असं झालं असतं की, जोस बटलरला रिषभ पंतकडे जाण्याचा आणि असे बोलण्याचा पूर्ण अधिकार आहे की, ‘अरे, तू पृथ्वीवर काय करतोय?’ त्याच्यासाठी एका प्रशिक्षकाला मैदानात पाठवणे आणि हा विचार करणे की, हे योग्य होते. मला नाही वाटत की, हा योग्य व्यवहार होता. आपण क्रिकेटच्या सज्जनांचा खेळ खेळतो आणि लोकं चुका करतात.”
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना जोस बटलरच्या ११९ धावांच्या शतकी खेळीच्या जोरावर २ विकेट्स गमावत २२२ धावा चोपल्या होत्या. यामध्ये दिल्लीला निर्धारित २० षटकात ८ विकेट्स गमावत २०७ धावाच करता आल्या. त्यामुळे दिल्लीला १५ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘खूश आहे की कंपनीच्या नावात माही’, धोनीच्या खेळावर आनंद महिंद्राही फिदा
ब्रेकिंग! प्रविण आमरे यांच्यावर बंदी, तर पंत, ठाकूरवरही मोठी कारवाई; नो बॉलचा वाद आला अंगाशी
IPL 2022| शतक केलं बटलरने आणि निशाण्यावर आला विराट, मीम्स सोशल मीडियावर व्हायरल