नवी दिल्ली| आयपीएल 2020 मधील 23 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघांचे वरच्या फळीतील फलंदाज फलंदाजीसाठी उपयुक्त असलेल्या खेळपट्टीवर अपयशी ठरले. राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात दिल्ली कपिटल्सने दोन अत्यंत महत्त्वपूर्ण फलंदाज कर्णधार श्रेयस अय्यर आणि यष्टीरक्षक रिषभ पंतची विकेट डावाच्या सुरुवातीलाच गमावली. हे दोन्ही फलंदाज धावबाद झाले.
कर्णधार श्रेयस अय्यर सहाव्या षटकात 22 धावांवर धावबाद झाला. अय्यरने कव्हर्सच्या दिशेने एक फटका खेळला आणि तिथे उभा असलेला क्षेत्ररक्षक यशस्वी जयस्वालने जबरदस्त डाइव्ह मारून चेंडू अडवला आणि यष्टीकडे फेकला, चेंडू यष्टीला लागला आणि श्रेयस धावबाद झाला.
शारजाहच्या खेळपट्टीवर दिल्लीचा यष्टीरक्षक रिषभ पंतलाही जास्त धावा करता आल्या नाही. पंतला राजस्थानचा क्षेत्ररक्षक मनन वोहराने धावबाद केले. नॉन स्ट्राईकवर उभा असलेला पंत धाव घेण्यासाठी क्रीझच्या पुढे आला आणि खेळपट्टीवर खेळत असलेला फलंदाज स्टॉयनिसने धाव घेण्यासाठी त्याला नकार दिला, त्याला क्रीझमध्ये परत यायला वेळ मिळाला नाही आणि पंत धावबाद झाला.
पंत आणि अय्यर धावबाद झाल्यानंतर दिल्लीने आपल्या नावावर एक नकोसा विक्रम नोंदवला. 2018 नंतर सर्वाधिकवेळा एकाच सामन्यात 2 फलंदाज धावबाद होणारा संघ म्हणून दिल्ली पहिल्या क्रमांकावर आहे. असे 5 वेळा घडले आहे, जेव्हा दिल्लीचे एकाच सामन्यात 2 किंवा त्याहून अधिक फलंदाज धावबाद झाले. आरसीबी आणि हैदराबाद संघाबाबत असे 4 वेळा घडले आहे.
असे असले तरी दिल्लीने राजस्थानला 46 धावांनी पराभूत केले. हा दिल्लीचा या आयपीएल हंगामातील 5 विजय होता.
महत्त्वाच्या बातम्या –
IPL 2020: पंजाब विरुद्ध कोलकाता सामन्यात होऊ शकतात ‘हे’ ५ खास विक्रम
महिला आयपीएलचे सामने होणार युएईमधील ‘या’ शहरात?
IPL 2020 : आज पंजाब-कोलकाता आणि चेन्नई-बेंगलोर येणार आमने-सामने, जाणून घ्या सामन्यांबद्दल सर्वकाही
ट्रेंडिंग लेख –
किस्से क्रिकेटचे – मैदानावर हत्ती आला आणि भारतीय संघाने इंग्लंडमध्ये विजयाचा श्रीगणेशा केला





