भारतीय संघाचा यष्टीरक्षक-फलंदाज रिषभ पंत (Rishabh Pant) याचा 30 डिसेंबरला पहाटे मोठा अपघात झालेला. हा अपघात दिल्ली-डेहराडून महामार्गावर झाला. त्यामध्ये तो गंभीररित्या जखमी झाला असून, सध्या मुंबई येथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. लिगामेंट तुटल्याने त्याच्यावर नुकतीच शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर सोमवारी (16 जानेवारी) त्याने प्रथमच ट्विट करत चहा त्यांचे व आपल्या हितचिंतकांचे आभार मानले.
I am humbled and grateful for all the support and good wishes. I am glad to let you know that my surgery was a success. The road to recovery has begun and I am ready for the challenges ahead.
Thank you to the @BCCI , @JayShah & government authorities for their incredible support.— Rishabh Pant (@RishabhPant17) January 16, 2023
रिषभच्या अपघातानंतर सातत्याने विविध बातम्या समोर येत होत्या. यानंतर त्याने सोमवारी स्वतः ट्विट करत सर्वांचे आभार मानले. त्याने लिहिले,
“सर्वांच्या समर्थन आणि शुभेच्छांसाठी मी नम्र आणि कृतज्ञ आहे. माझी शस्त्रक्रिया यशस्वी झाली हे तुम्हाला कळवण्यास मला आनंद होत आहे. पुनरागमनचा प्रवास सुरू झाला असून, मी पुढील आव्हानांसाठी तयार आहे. बीसीसीआय, जय शहा आणि अधिकाऱ्यांना अविश्वसनीय पाठिंब्याबद्दल धन्यवाद! प्रोत्साहनासाठी मी माझे सर्व चाहते, संघ सहकारी, डॉक्टर आणि फिजिओ यांचे मनापासून आभार मानू इच्छितो. तुम्हा सर्वांना मैदानावरून पाहण्यासाठी उत्सुक आहे.”
रिषभच्या अपघातानंतर त्याच्यावर सुरुवातीला डेहराडून येथे उपचार करण्यात आले. त्यानंतर मुंबई येथील कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर शस्त्रक्रिया देखील केली गेली. या शस्त्रक्रियेनंतर येत असलेल्या वृत्तानुसार, रिषभला पुन्हा एकदा दोन्ही पायांवर उभे राहण्याकरता 7-8 आठवड्यांचा अवधी लागू शकतो. परंतु त्याचवेळी त्याला मैदानावर सामन्यासाठी तंदुरुस्त होऊन परतण्यासाठी जवळपास 8-9 महिने लागू शकतात.
रिषभ इतक्या मोठ्या कालावधीसाठी संघाबाहेर गेला असल्याने तो अनेक महत्त्वाच्या स्पर्धांना मुकु शकतो. यामध्ये आशिया चषक, आयपीएल व वनडे विश्वचषक यांचा समावेश असेल.
(Rishabh Pant Tweeted For Saying Thank You After Accident)
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
नाद नाद नादच! भारताचा 19 वर्षांखालील महिला विश्वचषकात विश्वविक्रम, वाचून तुम्हालाही वाटेल अभिमान
‘रोहितलाही विराटसारखी वागणूक द्या…’, गौतम गंभारची मोठी प्रतिक्रिया