भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या विजयानंतर मस्तीच्या मूडमध्ये असल्याचे दिसत आहे. रोहित इतर क्रिकेटपटूंप्रमाणे सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो. अशात शनिवारी (दि. 15 जुलै) त्याने स्वत:चा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत तो फोनवर बोलताना दिसत आहे. रोहितच्या फोटोच्या कॅप्शनने सर्वांचे लक्ष वेधले होते. मात्र, आता त्याची पत्नी रितिका सजदेह हिने कमेंट करत रोहितची पोल खोलली आहे. रितिकाची कमेंट जोरदार व्हायरल होत आहे.
रोहित शर्माची पोस्ट
खरं तर, रोहित शर्मा (Rohit Sharma) याने इंस्टाग्राम आणि ट्विटरवर एक फोटो शेअर केला. हे फोटो शेअर करताना त्याने मजेशीर कॅप्शन देत लिहिले की, “अनारकलीचा फोन होता. आईस्क्रीम खाणे गरजेचे आहे.” रोहितचे हे कॅप्शन ‘बाजीगर’ सिनेमातील आहे. सिनेमातील हा डायलॉग विसरभोळ्या नोकराची भूमिका साकारणाऱ्या जॉनी लिव्हर (Jonny Lever) याने बोलला होता.
https://www.instagram.com/p/CuubJnAogeL/
रितिकाची कमेंट
रोहितच्या या पोस्टवर त्याची पत्नी रितिका सजदेह (Ritika Sajdeh) हिने त्याची मजा घेतली आहे. रितिकाने फोटोवर कमेंट करत लिहिले की, “तू तर माझ्याशी फोनवर बोलत होता आणि विचारत होता की, कॉफी मशीन ठीक आहे की नाही.” आता नेटकऱ्यांना रितिकाची ही कमेंट खूपच भावली आहे. त्यामुळे तिची कमेंट सोशल मीडियावर वाऱ्यासारखी व्हायरल होत आहे.
भारताचा विजय
खरं तर, रोहित शर्मा याने भारताच्या पहिल्या डावात 103 धावांची शतकी खेळी साकारली होती. हे त्याचे कसोटीतील 10वे शतक ठरले. रोहित शर्मा आणि यशस्वी जयसवाल यांच्यात पहिल्या विकेटसाठी 229 धावांची भागीदारी झाली. भारताने पहिल्या डावात 5 विकेट्स गमावत 421 धावा केल्या होत्या. तसेच, भारतीय संघाने विंडीजला विजयासाठी 172 धावांचे आव्हान दिले होते. मात्र, यजमान संघ 130 धावांवरच सर्वबाद झाला. त्यामुळे भारताने पहिला कसोटी सामना 1 डाव आणि 141 धावांनी जिंकला. आता दुसरा कसोटी सामन्याला 20 जुलैपासून सुरू होणार आहे. (ritika sajdeh comment viral on skipper rohit sharma anarkali phone call post)
महत्वाच्या बातम्या-
खूपच कमी वयात आफ्रिदीची कसोटीत मोठी कामगिरी, श्रीलंकेच्या सलामीवीराची विकेट घेताच रचला विक्रम; पाहा व्हिडिओ
दुर्लक्षित केल्या जाणाऱ्या सरफराजसाठी दिग्गज पाँटिंगही हळहळला; म्हणाला, ‘मला त्याच्यासाठी…’