पुणे। इंडियन प्रीमियर लीग २०२२ हंगामात ३९ वा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात पार पडला. या सामन्यात राजस्थानने २९ धावांनी विजय मिळवला. पण, राजस्थानच्या या विजयाबरोबर या सामन्यादरम्यान हर्षल पटेल आणि रियान पराग यांच्यात झालेल्या वादाची चर्चा चांगलीच रंगली.
पहिल्या डावात हर्षल-पराग यांच्या बाचाबाची
झाले असे की, या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) १५ व्या षटकांत ९९ धावांवरच ५ विकेट्स गमावल्या होत्या. अशा दबावाच्या परिस्थितीतही रियान परागने (Riyan Parag) राजस्थानकडून शानदार कामगिरी करत अर्धशतक झळकावले आणि राजस्थानला सन्मानजनक १४४ धावसंख्येपर्यंत पोहचवले.
त्याने ही खेळी करताना २० व्या षटकात २ षटकार आणि १ चौकारासह १८ धावा काढल्या. बेंगलोरकडून (Royal Challengers Bangalore) हे षटक हर्षल पटेल (Harshal Patel) टाकत होता. त्याने टाकलेल्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर परागने षटकार ठोकला.
त्यानंतर रियान डाव संपल्याने पॅव्हेलियनमध्ये परतत होता. पण, परत जात असताना तो अचानक मागे वळाला आणि त्यानंतर त्याच्यात आणि हर्षल पटेल यांच्याच शाब्दिक वाद रंगला. या वादाचे कारण नक्की कोण होते, हे स्पष्ट झाले नाही. पण, त्यांच्या जोरदार वाद ( झाल्याचे दिसून आहे. हा वाद सुरू असताना राजस्थान रॉयल्सच्या एका सपोर्ट स्टाफ सदस्याने या दोघांना बाजूला करण्याचा प्रयत्न केला. नंतर पराग ड्रेसिंग रुममध्ये निघून गेला (Riyan Parag, Harshal Patel involved in heated argument).
https://twitter.com/Biscuit8Chai/status/1518984698068111360
Harshal patel and riyan parag fight from stadium#riyanparag #harshalpatel #ipl #RRVSRCB #rcbvsrr #pune pic.twitter.com/2ICjMqO84O
— ♡JAYESH♡ (@Jayesh_Tweets_) April 26, 2022
हर्षलचा हस्तांदोलन करण्यास नकार
दरम्यान, पहिल्या डावात झालेला वाद पराग विसरला असल्याचे वाटत होते. कारण, सामना राजस्थान रॉयल्सने जिंकल्यानंतर दोन्ही संघातील खेळाडू एकमेकांना हस्तांदोलन करत होते, तेव्हा परागने हर्षलसमोरही हात पुढे केला होता. मात्र, हर्षलने त्याच्याबरोबर हात मिळवण्याचे टाळले आणि तो पुढे निघून गेला (refuses to shake hands). त्याची ही कृती पाहून रियान देखील चकीत झाल्याचे पाहायला मिळाले. या घटनेनंतर सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया उमटल्या. यातील अनेक प्रतिक्रियांमध्ये हर्षल पटेलवर खिलाडूवृत्ती न दाखवण्याची टीका करण्यात आली होती.
Immature Harshal Patel did not shake hands with 20 year old Riyan Parag. It’s such a shameful act 👎#HarshalPatel 😂😂👎👎🤭🤭#IPL2022 #RCBvRR pic.twitter.com/LrE2eEQFme
— Yash Jain (@Yashjain_1008) April 27, 2022
Immature Harshal Patel did not shake hands with 20 year old Riyan Parag. It’s such a shameful act 👎#HarshalPatel 😂😂👎👎🤭🤭#IPL2022 #RCBvRR https://t.co/3sxGpHDd1x
— Naveen Vijay 07 (@AppuKrish2) April 26, 2022
रियान परागला सामनावीर पुरस्कार
या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या राजस्थान रॉयल्सकडून रियान परागने ३१ चेंडूत ३ चौकार आणि ४ षटकारांसह नाबाद ५६ धावांची खेळी केली. या खेळीमुळे राजस्थानला २० षटकांत ८ बाद १४४ धावा करता आल्या. त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा डाव १९.३ षटकांत ११५ धावांवरच संपुष्टात आला. बेंगलोरकडून कर्णधार फाफ डू प्लेसिसने सर्वाधिक २३ धावा केल्या. अन्य कोणाला २० धावांचा टप्पाही ओलांडता आला नाही.
गोलंदाजीत बेंगलोरकडून मोहम्मद सिराज, वनिंदू हसरंगा आणि जोस हेजलवूड यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. तसेच हर्षल पटेलने १ विकेट घेतली. राजस्थानकडून कुलदीप सेनने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर आर अश्विनने ३ विकेट्स घेतल्या, तर प्रसिद्ध कृष्णाने २ विकेट्स घेतल्या.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
अरर! ‘गोल्डन डक’वर बाद होताच मॅक्सवेलचा नकोसा विक्रम, तब्बल ‘इतक्यांदा’ शून्यावर आऊट
‘…तेव्हा आम्हाला रोखणे कठीण होईल’, कोलकाताच्या कर्णधाराचे मोठे वक्तव्य
RCB vs RR सामन्यात राजस्थानच ‘रॉयल’, बेंगलोरला २९ धावांनी नमवत गुणतालिकेत घेतली उत्तुंग भरारी