युवा फलंदाज रियान पराग सध्या खूप चर्चेत आहे. आयपीएल २०२२ हंगामात रियानवर मोठ्या प्रमाणात टीका केल्या गेल्या. खराब प्रदर्शन आणि मैदानातील त्याचे वर्तन यामुळे तो सतत चर्चेत राहिला. असे असले तरी मैदानातील त्याचे प्रदर्शन मात्र समाधानकारक नव्हते. परागला देखील मान्य आहे की, त्याचे प्रदर्शन अपेक्षित नव्हते, पण तो स्वतःच्या फलंदाजी क्रमांकावर मात्र समधानी आहे. एमएस धोनीप्रमाणे रियान देखील ६ आणि ७ व्या क्रमांकावर स्वतःची छाप सोडू इच्छित आहे.
भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) त्याच्या संपूर्ण कारकिर्दीत संघासाठी फिनिशरच्या भूमिकेत खेळला आणि अनेक विक्रम केले. भारतीय संघाला धोनीसारखा फिनिशर पुन्हा कधी मिळेल, याविषयी शंका आहे. पण आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्ससाठी खेळणाऱ्या रियान पाराग (Riyan Parag) याला धोनीप्रमाणे संघातील ६ आणि ७ वा क्रमांक स्वतःचा बनवायचा आहे. रियानने यावर्षी आयपीएलच्या १७ सामन्यांमध्ये अवघ्या १८३ धावा केल्या, पण इतर कारणांमुळे तो सर्वांच्या नजरेत नक्कीच आला.
माध्यमांशी बोलताना रियान म्हणाला की, “मी खूप काही शिकत आहे. क्रमांक ६ आणि ७ सोपा नाहीये. लोक विचार करतात, तू फक्त येऊन षटकार मार, काहीच टेंशन नाही. पण गोष्टी अशा होत नाहीत. मी काही चांगल्या इनिंग्ज खेळल्या. मी नक्कीच अजून चांगले प्रदर्शन करू शकत होतो. पण जसे की मी सांगितले, शिकण्यासाठी अजून खूप काही आहे.”
“मी ज्या क्रमांकावर फलंदाजी करतो, त्यावर मी खुश आहे. मी माझ्या प्रदर्शनावर खुश नाहीये, पण मला वाटते की, मी फलंदाजी क्रमावर मात्र खुश आहे. मला ६ आणि ७ वा क्रमांक मिळवायचा आहे. जागतिक क्रिकेटमध्ये फक्त एका खेळाडूने असे केले आहे आणि तो आहे, एमएस धोनी. त्याच्याव्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याच दिग्गजाने असे केले नाहीये. मला त्या मार्गाने जायचे आहे. अपेक्षा आहे मला जो काही अनुभव आला आहे, तो मी पुढच्या वर्षी वापरू शकेल,” असेही रियान पराग पुढे बोलताना म्हणाला.
रियानने यावेळी असेही सांगितले की, तो भारतीय संघातून त्याला आमंत्रित केले जाण्याची वाट पाहत नाहीये. त्याला अजून खूप शिकायचे आहे आणि तो स्वतःची वेळ येईपर्यंत वाच पाहू इच्छित आहे. तोपर्यंत स्वतःच्या संघाला सामना जिंकवून देण्याचा प्रयत्न त्याचा असेल.
दरम्यान, रियानने दोन दिवसांपूर्वीच आणखी आपल्याला क्रिकेटमधील अनेक गोष्टी शिकायच्या आहेत असे म्हणत आपण अजून भारतीय संघात सामील होण्यास तयार नसल्याचे सांगितले होते.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
ऋतुराजच्या फलंदाजीवर दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज फिदा, म्हणाला ‘तो जबरदस्त गुणवंत खेळाडू आहे’
‘मला माहिती असते तर मीच उपाय शोधला नसता का?’, पत्रकारांच्या प्रश्नावर नॉर्किया भडकला
‘चहलला टी२० विश्वचषकासाठी संघात घेऊ नये!’, भारताच्या माजी दिग्गजाने सांगितले कारण