भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात जानेवारी 2023 च्या पहिल्या आठवड्यात टी-20 मालिका खेळली जाणार आहे. श्रीलंका संघ तीन सामन्यांची टी-20 आणि तीन सामन्यांच्या वनडे मालिका खेळली जात आहे. उभय संघांतील टी-20 मालिका 3 जानेवारी रोजी सुरू होणार असून यासाठी कर्णधार रोहित शर्मा आणि उपकर्णधार केएल राहुल उपस्थित नसतील, असे सांगितले जात आहे.
भारतीय संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याला बांगलादेशविरुद्धच्या वनेड मालिकेदरम्यान दुखापत झाली होती. बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या वनडे मालिकेत रोहितच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. दुखापत झाल्यानंतर त्याने संघासाठी या सामन्यात वादेळी फलंदाजी केली, पण विजय मात्र मिळवून देऊ शकला नाही. रोहितला झालेली दुखापत गंभीर असून याच कारणास्तव तो तिसऱ्या वनेड सामन्यात खेळू शकला नाही. त्यानंतर रोहितने बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेन देखील माघार घेतली. श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेपूर्वी रोहित फिट होईल, असे सांगितले जात होते. मात्र अजून तरी तसे होताना दिसत नाहीये.
दुसरीकडे भारतीय संघाचा उपकर्णधार केएल राहुल (Kl Rahul) देखील श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेत खेळताना दिसणार नाही, असाच अंदाज व्यक्त केला जात आहे. राहुल आणि बॉलिवुड अभिनेत्री आथिया शेट्टी (Athiya Shetty) मागच्या मोठ्या काळापासून एकमेकांना डेट करत आहेत. श्रीलंकेविरुद्धच्या या टी-20 मालिकेतून माघार घेऊन राहुल आथियासोबत लग्नबंधनात अडकणार असल्याचे सांगितले जात आहे. मागच्या काही दिवसांपासून राहिल जानेवारी महिन्यात लग्न करणार असल्याचे सांगितले जात आहे. अशात तो या मालिकेतून माघार घेण्याची पूर्ण शक्यता आहे.
दरम्यान, भारत आणि श्रीलंका यांच्यातील यांत्यातील टी-20 आणि वनडे मालिकेसाठी बीसीसीआय मंगळवारी (27 डिसेंबर) संघाची घोषणा करू शकते. उभय संघांतील टी-20 मालिकेत हार्दिक पंड्याकडे संघाचे कर्णधारपद सोपवले जाणार असल्याचेही सांगितले जात आहे. रोहित शर्मा आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांना टी-20 फॉरमॅटमधील कामाचा भार कमी करण्यासाठी बीसीसीआय नवीन कर्णधार आणि प्रशिक्षक नियुक्त करणार असल्याचे काही दिवसांपासून सांगितले जात आहे. अशात याविषयीचा निर्णय लवकरच समोर येऊ शकतो. (Rohit Sharma and KL Rahul to miss T20I series vs Sri Lanka)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ज्याने संघ फोडला त्यालाच मुख्य प्रशिक्षक बनवणार पाकिस्तान; नव्या अध्यक्षांनी दिली ऑफर
बीसीसीआयला जोर का झटका! आयपीएल 2023 च्या धमाकेदार आयोजनावर आयसीसीने फेरले पाणी