Loading...

बंगळुरु वनडेत विराट-रोहित जोडीचा धूमाकुळ, केले तब्बल १५ विक्रम

बंगळुरु। काल(19 जानेवारी) भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात तिसरा आणि निर्णायक वनडे सामना पार पडला. एम चिन्नास्वामी स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात भारताने 7 विकेट्सने विजय मिळवत वनडे मालिकाही 2-1 ने जिंकली.

भारताच्या या विजयात कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्माने दुसऱ्या विकेटसाठी 137 धावांची भागीदारी रचत महत्त्वाचा वाटा उचलला. याबरोबरच या दोघांनीही मोठे विक्रम केले आहेत.

या सामन्यात रोहितने 8 चौकार आणि 6 षटकारांसह 128 चेंडूत 119 धावांची खेळी केली. रोहितचे वनडे कारकिर्दीतील 29 वे शतक आहे. तर ऑस्ट्रेलिया विरुद्धचे 8 वे शतक आहे.  तसेच विराटने या सामन्यात 91 चेंडूत 8 चौकारांसह 89 धावा केल्या. विराटचे हे वनडे कारकिर्दीतील 57 वे अर्धशतक आहे.

विशेष म्हणजे ही महत्त्वपूर्ण खेळी करताना रोहितने वनडे कारकिर्दीत 9000 धावा पूर्ण करण्याचा पराक्रमही केला. तर विराटने कर्णधार म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या क्रिकेटपटूंच्या यादीत एमएस धोनीला मागे टाकले. असे अनेक विक्रम या दोघांनी रविवारी केले. या विक्रमांचा घेतलेला आढावा.

रोहित, विराटने केले हे विक्रम – 

Loading...

#1 वनडेमध्ये सर्वात जलद 5000 धावा करणारे कर्णधार – 

82 डाव – विराट कोहली

127 डाव – एमएस धोनी

131 डाव –  रिकी पाँटिंग

Loading...

135 डाव – ग्रॅमी स्मिथ

136 डाव – सौरव गांगुली

#2 वनडेमध्ये सर्वाधिक धावा करणारे भारतीय कर्णधार –

6641 धावा – एमएस धोनी

5239 धावा – मोहम्मद अझरुद्दीन

5104 धावा – सौरव गांगुली

Loading...

5072 धावा – विराट कोहली

#3 वनडेमध्ये सर्वात जलद 9000 धावा करणारे फलंदाज –

194 डाव – विराट कोहली

205 डाव – एबी डिविलियर्स

217 डाव – रोहित शर्मा

Loading...

228 डाव – सौरव गांगुली

235 डाव – सचिन तेंडुलकर

#4 वनडेत ऑस्ट्रेलिया विरुद्ध सर्वाधिक शतके करणारे फलंदाज –

9 शतके – सचिन तेंडूलकर (71 सामने)

8 शतके – विराट कोहली (40 सामने)

Loading...

8 शतके – रोहित शर्मा (40 सामने)

6 शतके – देडमंड हाईन्स (64 सामने)

5 शतके – फाफ डू प्लेसिस (22 सामने)

#5 वनडेमध्ये सर्वाधिक शतके करणारे फलंदाज – 

49 शतके – सचिन तेंडूलकर (463 सामने)

43 शतके – विराट कोहली (245 सामने)

30 शतके – रिकी पाँटिंग (375 सामने)

29 शतके – रोहित शर्मा (224 सामने)

28 शतके – सनथ जयसुर्या (445 सामने)

#6 सर्वात जलद 29 वे वनडे शतक करणारे फलंदाज – 

185 डाव – विराट कोहली

217 डाव – रोहित शर्मा

265 डाव – सचिन तेंडुलकर

330 डाव – रिकी पाँटिंग

#7 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करणारे खेळाडू-

15440 धावा – रिकी पाँटिंग

14878 धावा – ग्रॅमी स्मिथ

11561 धावा – स्टीफन फ्लेमिंग

11208 धावा – विराट कोहली

11207 धावा – एमएस धोनी

11062 धावा- ऍलन बॉर्डर

#8 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे भारतीय कर्णधार – 

11208 धावा – विराट कोहली

11207 धावा – एमएस धोनी

8095 धावा – मोहम्मद अझरुद्दीन

7665 धावा – सौरव गांगुली

#9 वनडेमध्ये सर्वाधिक वेळा 50 + धावा करणारे फलंदाज –

145 वेळा – सचिन तेंडुलकर

118 वेळा – कुमार संगकारा

112 वेळा – रिकी पाँटिंग

103 वेळा – जॅक कॅलिस

100 वेळा – विराट कोहली 

#10 ऑस्ट्रेलिया विरुद्ध वनडेत सर्वाधिक धावा करणारे फलंदाज – 

3077 धावा – सचिन तेंडुलकर

2262 धावा – देसमंड हाईन्स

2208 धावा – रोहित शर्मा

2187 धावा – व्हिव रिचर्ड्स

1910 धावा – विराट कोहली

1864 धावा – ओयन मॉर्गन

#11 वनडेत सर्वाधिक धावा करणारे फलंदाज – 

18426 धावा – सचिन तेंडुलकर (463 सामने)

14234 धावा – कुमार संगकारा (404 सामने)

13704 धावा – रिकी पाँटिंग (375 सामने)

13430 धावा – सनथ जयसुर्या (445 सामने)

12650 धावा – माहेला जयवर्धने (448 सामने)

11739 धावा – इंजमाम उल हक (378 सामने)

11703 धावा – विराट कोहली (245 सामने)

#12 वनडेमध्ये धावांचा पाठलाग करताना सर्वात जलद 7000 धावा –

133 डाव – विराट कोहली

180 डाव – सचिन तेंडुलकर

#13 वनडेमध्ये धावांचा पाठलाग करताना सर्वाधिकवेळा शतकी भागीदारी रचणाऱ्या क्रिकेपटूंच्या जोड्या – 

17 – सौरव गांगुली – सचिन तेंडुलकर

11 – विराट कोहली – रोहित शर्मा

10 – ऍडम गिलख्रिस्ट – मॅथ्यू हेडन

#14 एकाच संघाविरुद्ध सर्वाधिक वनडे शतके करणारे फलंदाज

9 – विराट कोहली, विरुद्ध वेस्ट इंडिज

9 – सचिन तेंडुलकर, विरुद्ध ऑस्ट्रेलिया

8 – सचिन तेंडुलकर, विरुद्ध श्रीलंका

8 – विराट कोहली, विरुद्ध ऑस्ट्रेलिया

8 – विराट कोहली, विरुद्ध श्रीलंका

8 – रोहित शर्मा, विरुद्ध ऑस्ट्रेलिया

#15 वनडेमध्ये सर्वाधिक चौकार मारणारे भारतीय फलंदाज –

2016 चौकार – सचिन तेंडूलकर – 463 सामने

1109 चौकार – विराट कोहली – 245 सामने

1104 चौकार – सौरव गांगुली –  308 सामने

1092 चौकार – विरेंद्र सेहवाग – 241 सामने

942 चौकार – राहुल द्रविड – 340 सामने

 

You might also like
Loading...