भारताचा माजी कर्णधार विराट कोहली आणि भारताचा सध्याचा कर्णधार रोहित शर्मा मागील काही वर्षांपासून दमदार कामगिरी करत आहेत. या दोघांवरच प्रमुख्याने भारताच्या फलंदाजीची मदार आहे आणि या दोघांनीही ही जबाबदारी चांगल्या प्रकारे सांभाळली आहे. रोहित रविवारी (दि. 05 नोव्हेंबर) त्याचा 35वा वाढदिवस साजरा करत आहे. त्यानिमित्ताने हा खास लेख…
पण अजून तरी रोहितने कसोटीत केवळ 52 सामने खेळले आहेत, तर विराटने 111 कसोटी सामने खेळले आहेत. त्यामुळे कसोटीच्या बाबतीत या दोघांची तुलना सध्या करणे चुकीचे ठरेल, पण वनडे आणि टी20 मध्ये जर विराट आणि रोहितच्या कामगिरीची तुलना मागील काही वर्षातील करायची म्हटली तर ती योग्य ठरेल. त्याच्या कारणांचा घेतलेला हा आढावा.
सन 2017 पासून या दोघांच्या वनडे कामगिरीचा आढावा घेतला, तर विराटने 2017 पासून 112 सामने खेळले आहेत. तसेच 66.16च्या सरासरीने त्याने 5955 धावा केल्या आहेत. यात त्याच्या 22 शतकांचा आणि 32 अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच तो 2017 पासून वनडेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे.
रोहितच्या कामगिरीचा आढावा घेतला, तर त्याने वनडेत 105 सामने 2017 पासून खेळले आहेत. या सामन्यात त्याने 59.81 च्या सरासरीने 5383 धावा केल्या आहेत. यात त्याच्या 21 शतकांचा आणि 25 अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच 2017 पासून रोहित वनडेत सर्वाधिक धावा करणाऱ्या जगातील खेळाडूंमध्ये विराट पाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर आहे.
त्याचबरोबर 2017पासून सर्वाधिक वनडे शतके करण्यामध्ये विराट आणि रोहित अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर आहेत. ही आकडेवारी पाहिली तर विराट आणि रोहितची पुढील काही वर्षेतरी सातत्याने एकमेकांशी वनडेमध्ये तुलना होऊ शकते.
टी20 क्रिकेटचा विचार केला, तर रोहितने 2017 पासून 86 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत. यात त्याने 3 शतकांसह 31.11च्या सरासरीने 2489 धावा केल्या आहेत. तो 2017 पासून भारताकडून सर्वाधिक टी20 धावा करणारा पहिला फलंदाज आहे. तसेच सर्वाधिक शतके करणाराही फलंदाज आहे, तर विराटने 2017पासून टी20 मध्ये 70 सामने खेळले असून 50.02च्या सरासरीने 2351 धावा केल्या आहेत.
एवढेच नाही तर आंतरराष्ट्रीय टी20मध्ये रोहितने एकूण 148 सामन्यात 3853 धावा केल्या आहेत, तर विराटने 115 सामन्यात 4008 धावा केल्या आहेत. त्यामुळे टी20 मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या जगातील एकूण खेळाडूंमध्येही विराट अव्वल क्रमांकावर आणि रोहित दुसऱ्या क्रमांकावर आहे.
त्याचबरोबर टी20मध्ये सर्वाधिकवेळा 50 किंवा त्यापेक्षा अधिक धावा करण्याच्या यादीत रोहित दुसऱ्या क्रमांकावर तर विराट अव्वल क्रमांकावर आहे. रोहितने 29 वेळा तर विराटने 37 वेळा आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये 50 किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी केली आहे. ही आकडेवारीही विराट आणि रोहितमध्ये टी20 च्या बाबतीतही तुलना होऊ शकते हेच दर्शवते.
हेही वाचा-
Birthday: 35व्या वयात पदार्पण करणाऱ्या विराटने केले आहेत ‘हे’ खास पराक्रम!
विराट कोहलीने जेव्हा गोलंदाजांची केली होती पळता भुई थोडी, वाचा त्याच्या 5 सर्वोत्तम खेळींबद्दल
थक्क करणारा प्रेरणादायी प्रवास, तोही ‘किंग’ कोहलीचा…!!!