भारत विरुद्ध इंग्लंडच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्याला आजपासून चेन्नईच्या मैदानावर सुरुवात झाली. या सामन्याचा पहिला दिवस भारतासाठी आशादायक ठरला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताने पहिल्या दिवसाखेर ६ बाद ३०० धावा केल्या आहेत.
भारताच्या या मजबूत सुरुवातीत रोहित शर्माचा मोलाचा वाटा होता. प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताची पहिल्या सत्रातच ३ बाद ८६ अशी अवस्था झाली होती. मात्र रोहितने २३१ चेंडूत १६१ धावांची तुफानी खेळी उभारत भारताचा डाव सावरला. या खेळी दरम्यान त्याने एक बहुमान देखील आपल्या नावे केला.
मायदेशात सर्वात कमी डावात १५०० धावा करणारा तिसरा खेळाडू
रोहितने आजच्या सामन्यात १६१ धावांची खेळी उभारताना भारतात १५०० धावांचा टप्पा ओलांडला. त्याने भारतातील अवघ्या २३ डावात हा कारनामा केला. त्यामुळे मायदेशात सर्वात कमी डावात १००० धावांचा टप्पा गाठणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो तिसऱ्या स्थानी पोहोचला. या यादीत सार्वकालीन महान फलंदाज डॉन ब्रॅडमन अव्वल स्थानी आहेत. त्यांनी १९ डावातच ही कामगिरी केली होती.
दुसऱ्या स्थानावर ऑस्ट्रेलियाचेच माजी फलंदाज डग वॉल्टर्स आहेत. त्यांनी मायदेशात २२ डावात १५०० धावांचा टप्पा गाठला आहे. तिसऱ्या स्थानी रोहित शर्मा पोहोचला असून चौथ्या स्थानी एव्हर्टन वीक्स आहेत. त्यांनी देखील २३ डावात १५०० धावा केल्या आहेत. या यादीत पाचव्या स्थानावर वेस्ट इंडिजचे महान अष्टपैलू गॅरी सोबर्स आहेत. त्यांनीही ही कामगिरी २३ डावात केली आहे.
मायदेशात सर्वात कमी डावात १५०० धावा करणारे खेळाडू-
डॉन ब्रॅडमन – १९ डग वॉल्टर्स – २२ रोहित शर्मा – २३* एव्हर्टन वीक्स – २३ गॅरी सोबर्स – २३
दरम्यान, सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय फलंदाजांचेच वर्चस्व राहिले. रोहित शर्माचे दीडशतक आणि अजिंक्य रहाणेचे अर्धशतक यामुळे भारतीय संघ पहिल्या डावात मजबूत स्थितीत आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने ६ बाद ३०० धावा केल्या आहेत. रिषभ पंत ३३ धावांवर नाबाद असून अक्षर पटेल ५ धावांवर खेळत आहे.
महत्वाच्या बातम्या:
रोहित शर्माच्या पहिल्या चौकरातच विराट कोहली झाला भलताच खुश! सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
जेव्हा रोहितने वाढवले रितीकाचे टेन्शन, बीसीसीआयने शेअर केला व्हिडिओ