सध्या भारत विरूद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) संघात 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. त्यातील पहिला कसोटी सामना बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी मैदानावर खेळला गेला. या सामन्यात न्यूझीलंडने भारताचा 8 गडी राखून पराभव केला. आता दुसरा कसोटी सामना (24 ते 28 ऑक्टोबर) दरम्यान पुणे येथे खेळला जाणार आहे. तत्पूर्वी या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) इतिहास रचू शकतो. तो भारताच्या माजी दिग्गजाचा रेकाॅर्ड मोडीत काढू शकतो.
(24 ऑक्टोबर) पासून पुण्यात होणाऱ्या न्यूझीलंडविरूद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात रोहित शर्माने (Rohit Sharma) 4 षटकार मारले तर तो कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणारा भारतीय फलंदाज ठरेल. सचिन तेंडुलकरला (Sachin Tendulkar) त्याच्या संपूर्ण कारकिर्दीत हा मोठा रेकाॅर्ड करता आला नाही. कसोटी क्रिकेटमध्ये सध्या 88 षटकार मारण्याचा रेकाॅर्ड रोहितच्या नावावर आहे. तर, वीरेंद्र सेहवागने (Virender Sehwag) कसोटीमध्ये 91 षटकार ठोकले होते. रोहित शर्मा पुण्यात फक्त 4 षटकार मारून वीरेंद्र सेहवागला मागे टाकण्याची शक्यता आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विश्वविक्रम इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू आणि कर्णधार बेन स्टोक्सच्या (Ben Stokes) नावावर आहे. स्टोक्सने कसोटी क्रिकेटमध्ये 131 षटकार ठोकले आहेत.
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे फलंदाज
131 षटकार- बेन स्टोक्स (इंग्लंड)
107 षटकार- ब्रेंडन मॅक्युलम (न्यूझीलंड)
100 षटकार- ॲडम गिलख्रिस्ट (ऑस्ट्रेलिया)
98 षटकार- ख्रिस गेल (वेस्ट इंडिज)
97 षटकार- जॅक कॅलिस (दक्षिण आफ्रिका)
93 षटकार- टिम साऊदी (न्यूझीलंड)
91 षटकार- वीरेंद्र सेहवाग (भारत)
88 षटकार- रोहित शर्मा (भारत)
88 षटकार- ब्रायन लारा (वेस्ट इंडिज)
87 षटकार- ख्रिस क्रेन्स (न्यूझीलंड)
87 षटकार- अँजेलो मॅथ्यूज (श्रीलंका)
महत्त्वाच्या बातम्या-
खराब फॉर्मशी झगडत असलेल्या बाबर आझमला सेहवागचा सल्ला, कमबॅक करण्याचं सूत्र सांगितलं
आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे टाॅप-5 खेळाडू, निवृत्तीनंतरही ‘हा’ भारतीय दिग्गज शीर्ष स्थानी
रोहित शर्माच्या नेतृत्वावर आकाश चोप्रांची टीका; म्हणाले, “हा निर्णय समजण्यापलीकडचा…”