fbpx
Wednesday, January 20, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मुंबई इंडियन्सची गेल्या ७ वर्षांची परंपरा कायम; यावर्षीही…

Rohit sharma led mumbai indians never win opening match

September 20, 2020
in क्रिकेट, IPL, टॉप बातम्या
0
Photo Courtesy: Twitter/IPL

Photo Courtesy: Twitter/IPL


दिग्गज फलंदाज रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्स संघाचा शनिवारी अबूधाबी येथे खेळल्या गेलेल्या आयपीएल 2020 च्या उद्घाटन सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून 5 गाड्यांनी पराभव झाला. रोहितने 2013 पासून आयपीएलच्या पहिल्या सामन्यात न जिंकण्याचा खराब विक्रम कायम ठेवला आहे. तथापि, रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्स 4 वेळा आयपीएलचे जेतेपद मिळविणारा एकमेव संघ आहे. 2013, 2015, 2017 आणि 2019 मध्ये मुंबई संघ चॅम्पियन बनला होता.

रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्स संघाचा 2013 च्या पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाकडून पराभव झाला होता. तर 2014 आणि 2015 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून त्यांचा पहिल्या सामन्यात पराभव झाला होता. तसेच 2016 आणि 2017 मध्ये रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघाने पहिल्या सामन्यातच मुंबईला पराभूत केले होते. 2018 मध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघाविरुद्ध आणि 2019 मध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाविरुद्ध पहिला सामना खेळताना मुंबई इंडियन्सला पराभवाला सामोरे जावे लागले होते. 2020 मध्ये पुन्हा मुंबई इंडियन्सचा सीएसकेकडून पराभव झाला आहे.

पहिल्या सामन्यात चेन्नईने मुंबईला केले पराभूत

दक्षिण आफ्रिका संघाचा फलंदाज फाफ डू प्लेसिससोबत मिळून अनुभवी फलंदाज अंबाती रायडू याने शतकी भागीदारी केली. त्यांच्या या भागीदारीमुळे चेन्नई सुपर किंग्जने गतविजेत्या मुंबई इंडियन्सला शनिवारी अबू धाबी येथे पाच गाड्यांनी पराभूत केले.

मुंबईने दिलेल्या 163 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना रायडूने 48 चेंडूंत 6 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 71 धावा फटकावल्या आणि डू प्लेसिसने 44 चेंडूत नाबाद 58 धावा केल्या. या दोघांनीं मिळून तिसऱ्या गाड्यासाठी 115 धावांची भागीदारी केली आणि चेन्नईचा डाव सावरला. अंतिम क्षणी सॅम करनने दोन षटकारांच्या मदतीने 18 धावा केल्या आणि चेन्नईने मुंबई इंडियन्सने दिलेले 163 धावांचे लक्ष 19.2 षटकांत पाच गडी गमावून गाठले. चेन्नईने 166 धावा केल्या.

तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना अखेरच्या सहा षटकांत मुंबई संघाने केवळ 41 धावा केल्या आणि 20 षटकांत मुंबई संघाने सहा गाडी गमावून 9 बाद 162 धावा केल्या. त्यांच्या बाजूने डावखुरा फलंदाज सौरभ तिवारी ( 31 चेंडूत 42 धावा, तीन चौकार, एक षटकार) आणि दक्षिण आफ्रिका संघाचा सलामीवीर फलंदाज क्विंटन डी कॉक (20 चेंडूंत 33 धावा, 5 चौकार) यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. मागील चारही सामन्यात मुंबईकडून चेन्नईचा पराभव झाला होता, परंतु यावेळी चेन्नईने कट्टर प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून शानदार सुरुवात केली.


Previous Post

‘कॅप्टनकूल’ एमएस धोनीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; असा पराक्रम करणारा पहिलाच कर्णधार

Next Post

वाढदिवस विशेष: राशिद खान विषयी माहित नसलेल्या ५ खास गोष्टी…

Related Posts

Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

“हा माझ्या जीवनातील सर्वात मोठा क्षण”, ब्रिस्बेन कसोटीतील विजयानंतर रिषभ पंतने व्यक्त केल्या भावना

January 20, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

“त्याच्याकडे असाधारण प्रतिभा आहे”, ऑस्ट्रेलियन फलंदाजाने केले रिषभ पंतचे कौतुक

January 20, 2021
Photo Courtesy: Twitter/@lionsdenkxip
टॉप बातम्या

आयपीएल २०२१ : पंजाबने ग्लेन मॅक्सवेलला दिला नारळ, तर ‘या’ खेळाडूंना ठेवले संघात कायम

January 20, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC and @BCCI
टॉप बातम्या

“मी अजूनही धक्क्यातून सावरलो नाही”, भारतीय संघाच्या विजयानंतर रिकी पाँटिंग यांची प्रतिक्रिया

January 20, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

…म्हणून भारतीय संघाच्या विजयानंतर राहुल द्रविडची होतेय चर्चा

January 20, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

BAN vs WI : शाकिब अल हसनच्या दमदार पुनरागमनाच्या जोरावर बांग्लादेशचा विंडीजवर ६ गड्यांनी विजय

January 20, 2021
Next Post
Photo Courtesy: Twitter/cricketworldcup

वाढदिवस विशेष: राशिद खान विषयी माहित नसलेल्या ५ खास गोष्टी...

Photo Courtesy: Facebook/IPL

आज किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध दिल्ली कॅपिटल्समध्ये रंगणार सामना; जाणून घ्या सर्वकाही...

Photo Courtesy: Twitter/ mipaltan

लेगस्पिनर ठरली रोहित शर्मासाठी डोकेदुखी; जाणून घ्या काय आहे कारण

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.