22 ते 26 नोव्हेंबर दरम्यान कोलकाता (Kolkata) येथे भारत विरुद्ध बांगलादेश संघात (India vs Bangladesh) दिवस-रात्र कसोटी (Day-Night Test Match) सामना पार पडणार आहे. या कसोटी सामन्यानंतर डिसेंबरमध्ये भारत विरुद्ध वेस्ट इंडीज संघात टी20 (T20) आणि वनडे (ODI) मालिका होणार आहेत.
या मालिकांसाठी 21 नोव्हेंबरला भारतीय संघाची निवड होणार आहे. भारतीय संघाची निवड करण्यासाठी निवड समीती कोलकाता येथे 21 नोव्हेंबरला बैठक घेणार आहे.
यावेळी वेस्ट इंडीज विरुद्धच्या 3 सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माला(Rohit Sharma) विश्रांती दिली जाण्याची शक्यता आहे. रोहित या वर्षाच्या सुरुवातीपासून सातत्याने क्रिकेट खेळत आहे.
तसेच रोहितऐवजी वनडे मालिकेत मयंक अगरवालला (Mayank Agarwal) संधी मिळण्याची शक्यता आहे. अगरवालने कसोटी क्रिकेटमध्ये खेळताना चांगली कामगिरी केली आहे. त्याने खेळलेल्या 8 कसोटी सामन्यात 2 द्विशतकेही केली आहेत.
रोहित 2019 च्या सुरुवातीपासून सातत्याने खेळत असून त्याने या वर्षात जवळ जवळ 60 पेक्षा अधिक सामने खेळले आहेत. यामध्ये आयपीएलच्या 16 सामन्यांचा देखील समावेश आहे. त्याचमुळे त्याच्यावरील ताण कमी करण्यासाठी संघव्यवस्थापन त्याला विश्रांती देण्याची शक्यता आहे.
पण असे असले तरी मुंबई मिररने दिलेल्या वृत्तानुसार रोहितची विश्रांती घेण्याची इच्छा नाही. परंतू भारतीय संघाच्या आगामी मालिका आणि परदेश दौरे लक्षात घेता संघव्यवस्थापन रोहितला विश्रांती घेण्याचा सल्ला देऊ शकतात.
भारताला विंडीज विरुद्धच्या टी20 आणि वनडे मालिकेनंतर जानेवारी 2020मध्ये श्रीलंकेविरुद्ध मायदेशात 3 सामन्यांची टी20 मालिका खेळायची आहे. त्यानंतर भारतीय संघ न्यूझीलंड दौरा करणार आहे.
विंडीज विरुद्धची 3 सामन्यांची टी20 मालिका 6 डिसेंबरपासून सुरु होणार आहे. तर वनडे मालिका 15 डिसेंबरपासून सुरु होणार आहे.
पहिल्या दिवस-रात्र कसोटीसाठी टीम इंडियाचे कोलकातामध्ये झाले असे स्वागत; पहा व्हिडिओ…
वाचा- https://t.co/szDAeowjiG#म #मराठी #INDvBAN #CricketNation @BeyondMarathi
— Maha Sports (@Maha_Sports) November 19, 2019
या स्पर्धेत टीम इंडिया पाकिस्तान विरुद्ध खेळणार सेमीफायनलचा सामना
वाचा- https://t.co/D5Ye88wX0G@Marathirt #म #मराठी #CricketMeriJaan— Maha Sports (@Maha_Sports) November 19, 2019






