भारतीय संघाला 19 सप्टेंबरपासून बांग्लादेशविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. कसोटीनंतर तीन सामन्यांची टी-20 मालिकाही होणार आहे. कसोटी मालिकेपूर्वी भारतीय कर्णधार रोहित शर्मा मेहनत करताना दिसत आहे. कसोटी मालिकेत अजून बराच वेळ शिल्लक असला तरी रोहित शर्मा कोणतीही कसर सोडत नाहीये. हिटमॅनच्या सरावाचा एक मनोरंजक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये तो सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायरसोबत दिसत आहे.
व्हिडिओमध्ये रोहित शर्मा सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायर याच्यासोबत सराव केल्यानंतर परतताना दिसत आहे. रोहित शर्मा 5 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या दुलीप ट्रॉफीमध्ये भाग घेणार नाही, त्यामुळे त्याने बांग्लादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी सराव सुरू केला आहे.
Captain Rohit Sharma and Abhishek Nayar after practice and training session.
– The Hitman is working hard for the Test Summer. ????pic.twitter.com/p3DGpMkHG2
— Tanuj Singh (@ImTanujSingh) August 24, 2024
रोहितने मार्च 2024 मध्ये शेवटचा कसोटी सामना खेळला होता, जो इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेनंतरचा शेवटचा सामना होता. तेव्हापासून हिटमॅन फक्त पांढऱ्या चेंडूचे क्रिकेट खेळला आहे. अशा परिस्थितीत रोहित शर्मा आता कसोटी क्रिकेटसाठी स्वत:ला तयार करण्याचा प्रयत्न करत आहे.
बांग्लादेशनंतर भारतीय संघ घरच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांच्या भूमीवर पाच सामन्यांची बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी खेळली जाणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची अंतिम फेरी गाठण्यासाठी टीम इंडियासाठी या सर्व कसोटी मालिका खूप महत्त्वाच्या असणार आहेत.
खरं तर, गेल्या दोन मोसमात जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत धडक मारणाऱ्या टीम इंडियाला सलग तिसऱ्यांदा अंतिम फेरीत प्रवेश करायचा आहे. सध्या टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या 2023-25 सायकलच्या पॉइंट टेबलमध्ये अव्वल स्थानावर आहे. भारताने आतापर्यंत 9 कसोटी सामने खेळले आहेत, त्यापैकी 6 जिंकले आहेत, 2 गमावले आहेत आणि 1 अनिर्णित राहिला आहे.
हेही वाचा-
भारतीय कर्णधार रोहित शर्माबद्दल स्टार खेळाडूनं केलं खळबळजनक वक्तव्य! म्हणाला…
राहुल द्रविडच्या मुलाला सूर गवसेना, पुन्हा छोटेखानी खेळीवर बाद; संघाचाही तिसरा पराभव
अमेरिकेकडून क्रिकेट खेळणार ‘हा’ भारतीय खेळाडू, नावावर आहेत 5 हजारांहून अधिक धावा






