भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्ध सलग दुसरा विजय मिळवून टी२० मालिकेत विजयी आघाडी घेतली आहे. दुसऱ्या सामन्यात भारताने न्यूझीलंडला ७ विकेट्स राखून पराभूत केले. यानंतर भारताने ३ सामन्यांच्या टी२० मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे. भारताच्या टी२० संघाचा नियमीत कर्णधार म्हणून रोहित शर्माच्या नेतृत्वातील ही पहिली टी२० मालिका असून त्यात विजय मिळाल्यामुळे तो आनंदात दिसला. त्याने विजयाचे श्रेय संपूर्ण संघाला दिले. या सामन्यात भारतासाठी टी२० पदार्पण करणाऱ्या हर्षल पटलेचेही त्याने कौतुक केले.
रोहित शर्माने सामन्यानंतर बोलताना संपूर्ण संघाचे कौतुक केले. यावेळी तो म्हणाला की, “संपूर्ण संघाने चांगला प्रयत्न केला. येथे परिस्थिती सोपी नव्हती, पण आम्ही स्वतःला ज्याप्रकारे यासाठी तयार केले, ते अद्भुत होते. आम्हाला त्यांच्या फलंदाजांची गुणवत्ता माहीत आहे. त्यांनी सुरुवातीला काही चांगले शॉट खेळले, पण मी खेळाडूंना म्हटलो की, एका विकेटची गोष्ट आहे. आम्ही त्यांना रोखण्यासाठी चांगला प्रयत्न केला आणि जिद्द दाखवली.”
तो पुढे म्हणाला, “संघातील बाहेर बसलेल्या खेळाडूंची गुणवत्ता अद्भुत आहे. जेव्हा संघात त्यांना संधी मिळते, तेव्हा ते नेहमी चांगले प्रदर्शन करतात. माझ्यासाठी त्यांना मोकळीक देणे जास्त गरजेचे आहे. बाकी गोष्टी ते स्वतः सांभाळतील.”
‘हा एक युवा संघ आहे आणि यांनी जास्त सामने खेळले नाहीत. हे गरजेचे आहे की, यांना मधे वेळ मिळावा. पुढच्या सामन्यात बदल करण्याविषयी विचार करणे घाई होईल. भारतीय संघाला जे अनुकूल असेल, आम्ही ते करू. आम्हाला हे सुनिश्चित करण्याची गरज आहे की, आम्ही त्या खेळाडूंवर लक्ष द्यावे, जे आत्ता खेळत आहेत. ते खुप जास्त खेळलेले नाहीत. जे खेळलेले नाहीत, त्यांचीही वेळ येईल. खूप टी२० आहेत. हर्षलने वेळो वेळी दाखवले आहे की, तो एक कुशल गोलंदाज आहे. या परिस्थितीही त्याने संथ गतीच्या चेंडूचा योग्य वापर केला,’ असेही रोहित शर्माने पुढे बोलताना सांगितले आहे.
दरम्यान, भारताने सामन्यात नाणेफेक जिंकली आणि न्यूझीलंडला प्रथम फलंदाजी करायला आमंत्रित केले. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना ६ विकेट्सच्या नुकसानावर १५३ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने १७.२ षटकात आणि ३ विकेट्सच्या नुकसानावर हे लक्ष्य गाठले. हर्षल पटेलने भारतासाठी सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या. तसेच सलामीवीर रोहित शर्मा ५५ आणि केएल राहुलने ६५ धावा केल्या. न्यूझीलंडसाठी कर्णधार टिम साउथीने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
‘चुका करतो आणि शिकतो’, पदार्पणाच्या सामन्यातच ‘सामनावीर’ ठरलेल्या हर्षल पटेलची प्रतिक्रिया
वाढदिवस विशेष: भारताची स्टार कुस्तीपटू बबीता फोगटबद्दल खास ५ गोष्टी घ्या जाणून
रो-हिटचा जलवा! न्यूझीलंडविरुद्ध झळकवले विक्रमी अर्धशतक