भारतीय कर्णधार रोहित शर्माला गुलाबी चेंडूने कसोटी सामने खेळण्याचा अनुभव आहे. त्याने आतापर्यंत तीन दिवस-रात्र कसोटी सामने खेळले आहेत. मात्र, अद्याप त्याच्या बॅटमधून एकही मोठी खेळी झालेली नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्ध ॲडलेडमध्ये खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी जाणून घेऊयात गुलाबी चेंडूने हिटमॅन रोहित शर्माची आकडेवारी कशी आहे? कारण तो पहिला (पर्थ) कसोटी सामना खेळला नाही. तो आता थेट दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळणार आहे. अशा स्थितीत त्याच्यावर दडपण असणार आहे.
रोहित शर्माच्या गुलाबी चेंडूच्या कसोटी सामन्यांच्या आकडेवारीबद्दल बोलायचे झाल्यास, तो आतापर्यंत तीन गुलाबी चेंडू सामने खेळला आहे. यातील त्याची सर्वोच्च धावसंख्या 66 आहे. भारतासाठी फक्त एकाच फलंदाजाने गुलाबी चेंडूने शतक झळकावले आहे. तो म्हणजे विराट कोहली. बांग्लादेशविरुद्ध त्याने ही कामगिरी केली होती. तर रोहित शर्माला तीन सामन्यांत केवळ एकच अर्धशतक झळकावता आले आहे. त्याची सरासरी 43.33 आहे. तसेच त्याने एकूण 173 धावा केल्या आहेत. अशा परिस्थितीत भारताला बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा दुसरा सामना जिंकायचा असेल तर रोहित शर्माला आपल्या अनुभवाचा उपयोग करून मोठी खेळी खेळावी लागेल.
तत्तपूर्वी ऑस्ट्रेलियाला दोन मोठे धक्के बसले आहेत. मिचेल मार्श अद्याप पूर्णपणे तंदुरुस्त नाही. तर जोश हेझलवूड गुलाबी चेंडूच्या कसोटीतून बाहेर पडला आहे. हेझलवूडलाही दुखापत झाली आहे. हा तोच हेझलवूड आहे, ज्याने गेल्या वेळी ॲडलेडमध्ये झालेल्या गुलाबी चेंडूच्या कसोटी सामन्यात भारताला 36 धावांत गुंडाळले होते. त्या सामन्यात हेझलवूडने दुसऱ्या डावात 5 विकेट्स घेतल्या होत्या. गोलंदाजीशिवाय ऑस्ट्रेलियाला फलंदाजीतही अडचणी आहेत. ऑस्ट्रेलियाकडे अनुभवी सलामीवीर नाही. संघाने पहिल्या कसोटी सामन्यात नॅथन मॅकस्विनीला संधी दिली होती. पण छाप पाडण्यात तो अपयशी ठरला.
हेही वाचा-
जो रूटने मोडला सचिन तेंडुलकरचा आणखी एक विश्वविक्रम, आता या बाबतीत अव्वल स्थानी
भारताला क्लीन स्वीप केलेल्या न्यूझीलंडचे दारुण पराभव, इंग्लंडने टी20 शैलीत जिंकला सामना!
Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफी हायब्रिड मॉडेलमध्ये होणार! टीम इंडियाचे या ठिकाणी होणार सामने