मागील काही काळापासून टी२० क्रिकेट हा प्रकार सर्वात जलद लोकप्रिय झाला आहे. याबाबत भारताचा कर्णधार रोहित शर्माचे म्हणणे आहे की, या प्रकारच्या सामन्यात संघाला आक्रमकपणे खेळताना कधी-कधी पराभव स्विकारावा लागतो. मात्र मागील वर्षी झालेल्या टी२० विश्वचषकात भारताने जुनाट पद्धतीने खेळ केला होता, या विधानाला त्याने नकार दर्शविला आहे. तर आगामी टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघ तयार आहे असे मोठे विधानही रोहितने केले आहे.
दुबईमध्ये झालेल्या या टी२० विश्वचषकात भारत साखळी फेरीतून बाहेर पडला होता. या स्पर्धेत विराट कोहली (Virat Kohli) याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ खेळला. विराट आक्रमकपणे खेळणारा खेळाडू आहे. त्यामुळे तो जेव्हा भारतीय संघाचा कर्णधार झाला तेव्हापासून त्याच्याबरोबर संघाच्या खेळातही आक्रमकपणा दिसून आला अशा चर्चा होत होत्या. भारतीय संघाने सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली आक्रमक तर एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली शांत खेळ केला आहे. यावरून कर्णधाराचा खेळ कसा असतो यावरही संघाचा खेळ अवलंबून असतो.
आक्रमक की शांत खेळ करायचा याचे स्पष्टीकरण देताना रोहित शर्मा (Rohit Sharma) याने म्हणाला, ” नवीन पद्धतीने किंवा खेळाडूंना त्यांच्या नैसर्गिक पद्धतीने खेळ करण्याचे खेळाडूंना स्वातंत्र्य मिळाले आहे. त्यामुळे विश्वचषकातील पराभवाच्या निराशेतून संघ बाहेर निघत उत्तम कामगिरी करत असून अनेक मालिकाही जिंकल्या आहेत.”
रोहितने वेस्ट इंडिज विरुद्ध सुरू होणाऱ्या टी२० मालिकेआधी म्हटले, “आम्ही मागील विश्वचषकात साजेशा खेळ केला नाही. याचा अर्थ असा नाही की आम्ही चुकीचे क्रिकेट खेळलो आहोत. जर विश्वचषकात एक-दोन सामने पराभूत झालो याचा अर्थ असा नाही की आम्ही मिळालेल्या संधींचा फायदाच उचलला नाही.”
खेळाडूंना त्यांचा नैसर्गिक खेळ करण्याची पूर्णपणे मुभा- रोहित
विश्वचषकाआधी खेळलेल्या सामन्यांचा आलेख पाहिला तर आम्ही जवळपास ८० टक्के सामने जिंकलो आहोत. जर आम्ही जुन्या पद्धतीने खेळलो असतो तर असे सामने जिंकलोच नसतो. मान्य करतो आम्ही विश्वचषकामध्ये पराभूत झालो, असे होतच राहते. त्या स्पर्धेत जसा खेळ केला तसाच आता करत आहोत. याच फक्त एकच फरक आहे जो म्हणजे, खेळाडूंना त्यांचा नैसर्गिक खेळ करण्याची सूट दिली आहे. जेव्हा एखादा खेळाडू त्याच्यावर कोणताच दबाव नसला तर तो चांगली कामगिरी करतो.
भारतीय संघात होणारे अनेक बदल
रोहितच्या मते, संघाला आणि चाहत्यांना बदलातून पुढे जायचे असते. “आमच्या खेळाच्या पद्धतीमध्ये काही बदल झाला असून आम्हाला पराभवही स्विकारावा लागला आहे. मात्र त्यातून आम्ही काही नवीन शिकलो आहोत. तसेच खेळाडू चांगली कामगिरी करत असून त्यात काही चुका पण होत असतात. वेळेनुसार बदल हे करावेच लागतात. तर आता प्रेक्षकांच्या विचारांमध्ये बदल करण्याची आवश्यकता आहे,” असेही रोहितने पुढे म्हटले आहे.
आगामी टी२० विश्वचषकासाठी संघबांधणी पूर्ण
भारतीय क्रिकेट बोर्डाने आगामी टी२० विश्वचषकासाठी संघाबांधणी करताना नवनवीन कल्पना लढवल्या. रोहित म्हणाला, “जवळपास संघ तयार असून फक्त काही जागा भरणे शिल्लक आहे. या जागा कसे भरणे हे आम्हाला माहित आहे. सध्या आम्ही सामने खेळण्यावर लक्ष केंद्रित केले आहे.”
यावर्षीचा टी२० विश्वचषक ऑस्ट्रेलियात ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात खेळला जाणार आहे. भारतीय संघाची टी२० विश्वचषकाची कसून तयारी करत आहे. संघ सध्या सर्वाधिक टी२० सामने खेळण्यावर भर देत आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
रेणुका सिंगची ऐतिहासिक कामगिरी, बनली झुलन गोस्वामीनंतर ‘हा’ पराक्रम करणारी दुसरी भारतीय
रोहित काढणार वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांचा घाम! नेट्समध्ये सिग्नेचर पुल शॉट दिसला मारताना
हार्दिकसारख्या ऑलराऊंडरचा शोध संपला! २५ वर्षीय खेळाडू ठोठावतोय टीम इंडियाचं दार