भारतीय क्रिकेट संघ लंडनमधील ओव्हल स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध जागतिक कसोटी अजिंक्यपदचा अंतिम सामना खेळणार आहे. ही स्पर्धा 7 जूनपासून सुरू होईल. तसेच या सामन्यावेळी सर्वांच्या नजरा भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मावर असतील. या सामन्यात रोहितच्या नावी खास विक्रम नोंदवला जाईल. तर चला जाणून घेऊ हिटमॅन कोणता विक्रम मोडीत काढणार आहे.
रोहितच्या निशाण्यावर होईल मोठा विक्रम
रोहित जागतिक कसोटी अजिंक्यपदच्या अंतिम फेरीतही मोठा विक्रम करू शकतो. या सामन्यात रोहितने 27 धावा केल्या तर 13 हजार धावा करणारा तो भारतीय क्रिकेट इतिहासातील तिसरा सलामीवीर ठरणार आहे. तसेच रोहितच्या (Rohit Sharma) नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 12973 धावा आहेत.
हा पराक्रम फक्त सेहवाग आणि सचिनच्या नावी
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 15 हजार पेक्षा जास्त धावा करणारे भारताचे फक्त दोनच फलंदाज आहेत. पहिले नाव म्हणजे वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) आणि दुसरे नाव क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरचे (Sachin Tendulkar) आहे. जागतिक क्रिकेट अजिंक्यपदच्यावेळी 27 धावा केल्यानंतर रोहित 13 हजार धावांचा मोठा आकडा गाठणारा तिसरा फलंदाज ठरणार आहे. अव्वल स्थानी असणाऱ्या सेहवागच्या नावावर सलामी करताना 15758 आंतरराष्ट्रीय धावा आहेत. तर सचिनने ओपनिंग करताना 15335 धावा केल्या आहेत. रोहितला सचिन आणि सेहवागच्या यादीमध्ये सामील होण्याची ही सुवर्ण संधी आहे.
सलामी करताना सर्वाधिक धावा करणारे भारतीय फलंदाज:
15758 धावा – वीरेंद्र सेहवाग
15335 धावा – सचिन तेंडुलकर
12973 धावा – रोहित शर्मा
12258 धावा – सुनील गावस्कर
10867 धावा – शिखर धवन
गावस्कर आणि धवन यांचेही यादीत आहे नाव
या यादीमध्ये सुनील गावस्करचे (Sunil Gavaskar) नाव चौथ्या क्रमांकावर आहे. तर, गावस्करने आपल्या कारकिर्दीत ओपनिंग करताना 12258 धावा केल्या होत्या. तसेच या यादीमध्ये पाचव्या क्रमांकावरती शिखर धवनचे (Shikhar Dhawan) नाव आहे. धवनने ओपनिंग करताना 10867 धावा केल्या आहेत. आता रोहितही हा मोठा आकडा गाठेला का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Indian Cricket Team vs Australia)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कोण म्हणतंय ‘सुपरस्टार’, तर कुणी विराटच्या कव्हर ड्राईव्हच्या प्रेमात! कांगारुंकडून ‘किंग’ कोहलीचं कौतुक
भारतासाठी 7 वर्षांपासून खेळतोय, 212 विकेट्सही नावावर, पण कधीच खेळला नाही कसोटी सामना; तो खेळाडू कोण?