रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या नेतृत्वातील भारतीय संघ सध्या बांगलादेश दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारत आणि बांगलादेश यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय आणि दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना बांगलादेशने एक विकेट राखून जिंकला. उभय संघांतील दुसरा सामना बुधवारी (7 डिसेंबर) खेळला जाणार आहे. मालिका जिंकण्यासाठी भारताला हा दुसरा सामना जिंकवा लागणार आहे. संघ जर या सामन्यात पराभूत झाला, तर मालिका गमावेलच, पण एमएस धोनी याने केलेल्या इतिहासाची पुनरावृत्ती होऊ शकते.
भारतीय संघ (Team India) जवळपास 7 वर्षांनंतर बांगलादेश दौऱ्यापर आला आहे. यापूर्वी एमएस धोनी (MS Dhoni) याच्या नेतृत्वातील भारतीय संघ 2015 मध्ये बांगलादेश दौऱ्यावर आला होता. या दौऱ्यात भारताला तीन सामन्यांच्या मालिका खेळली असून 2-1 असा पराभव स्वीकारला होता. मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये भारतीय संघ पराभूत झाला असून शेवटच्या सामन्यात मात्र संघाने विजय मिळवला होता. अशात यावर्षीच्या दौऱ्यात देखील बांगलादेश संघ हा इतिहास पुन्हा एकदा प्रत्यक्षात उतरवू शकतो. यावर्षीच्या दौऱ्यातील पहिल्या सामन्यात भारतीय संघ अवघ्या एका विकेटच्या अंतराने पराभूत झाला.
रविवारी (4 डिसेंबर) खेळल्या गेलेल्या या सामन्यात बांगलादेशचा माजी कर्णधार शाकिब अल हसन (Shakib Al Hasan) आणि मेहदी हसन मिराज (Mehidy Hasan Miraz) यांनी मॅच विनरची भूमिका बजावली. बांगलादेशने या सामन्यात 40 व्या षटकात 9वी विकेट गमावली होती. पण शेवटच्या विकेटसाठी मेहदी सहन आणि मुस्तफिजूर रहमान यांनी 50 धावांपेक्षा मोठी खेळी केली. तत्पूर्वी भारताने प्रथम फलंदाजी करताना अवग्या 186 धावांवर सर्व विकेट्स गमावल्या. भारतासाठी नेमही सलामीला येणारा केएल राहुल या सामन्यात मात्र पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आला. राहुलने 73 धावांची खेळी केली असून
एकदिवसीय मालिकेसाठी निवडलेले दोन्ही संघ –
भारत: रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल (उपकर्णधार आणि यष्टीरक्षक), शिखर धवन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, इशान किशन (यष्टीरक्षक), शाहबाज अहमद, अक्षर पटेल, दीपक चाहर, मोहम्मद सिराज, कुलदीप सेन, शार्दुल ठाकुर, उमरान मलिक, वाशिंगटन सुंदर, राहुल त्रिपाठी, रजत पाटीदार.
बांगलादेश: लिटन दास, अनामुल हक बिजॉय, शाकिब अल हसन, मुश्फिकुर रहीम, अफीफ हुसैन, यासिर अली चौधरी, मेहदी हसन मिराज, मुस्तफिजुर रहमान, तस्कीन अहमद, हसन महमूद, इबादत हुसैन चौधरी, नासुम अहमद, महमूद उल्लाह, नजमुल हुसैन शान्तो, काजी नुरुल हसन सोहन, शोरफुल इस्लाम.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पहिल्या कसोटीतील पराभवानंतर पाकिस्तानचा अजून एक धक्का! दुखापतीमुळे वेगवान गोलंदाज मालिकेतून बाहेर
व्हिडिओ: एकीकडे सानियाशी घटस्फोटाच्या बातम्या, तर दुसरीकडे शोएब मुलासोबत लॅम्बोर्गिनीत मारतोय फेरफटका