---Advertisement---

“किती शतकं केली यापेक्षा जेतेपद मिळवणे महत्वाचे”, नवनिर्वाचित कर्णधार रोहितचे वक्तव्य

On: शुक्रवार, डिसेंबर 10, 2021 2:28 PM
Rohit-Sharma
---Advertisement---

आयसीसी टी२० विश्वचषक स्पर्धा सुरू होण्यापूर्वी विराट कोहलीने टी२० संघाचे कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली होती. या स्पर्धेत भारतीय संघाने निराशाजनक कामगिरी केल्यानंतर विराट कोहली याने टी२० कर्णधार पदावरून पायउतार करण्याचा निर्णय घेतला होता. आता दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी विराट कोहलीला वनडे संघाच्या कर्णधार पदावरून काढून टाकण्यात आले आहे. त्याच्या ऐवजी रोहित शर्मा याला ही जबाबदारी देण्यात आली आहे. दरम्यान रोहित शर्माने वनडे संघाचे कर्णधारपद स्विकारताच मोठे वक्तव्य केले आहे.

चॅट शो ‘बॅकस्टेज विद बोरीया’ वर बोलताना रोहित शर्माने म्हटले की, “जेतेपद मिळवणे हेच खेळाडूचे अंतिम लक्ष्य असायला हवे. तुम्ही किती ही शतकं करा ते महत्वाचं नाही. परंतु, विश्वचषक स्पर्धा जिंकणे खूप महत्वाचे आहे.” विराट कोहलीने फलंदाज म्हणून अनेक मोठ मोठे विक्रम आपल्या नावावर केले. परंतु, त्याला आयसीसी स्पर्धेचे एकही जेतेपद मिळवून देता आले नाही.

रोहित शर्मा म्हणाला की, “जेव्हा तुम्ही एखादा खेळ खेळता, त्यावेळी सर्वोत्तम कामगिरी करणे हे तुमचे प्राथमिक ध्येय असते. तुम्हाला सर्वात मोठी स्पर्धा जिंकायची असते. तुम्ही कितीही शतकं करा ते महत्वाचं नाही. परंतु, विश्वचषक स्पर्धा जिंकणे खूप महत्वाचे आहे . कारण ते संपूर्ण संघाचे एकत्रित प्रयत्न आणि यश असते.”

विराट कोहलीची वनडे संघाचा कर्णधार म्हणून कारकीर्द 
त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने १९ पैकी १५ मालिकांमध्ये विजय मिळवला होता. यापैकी मायदेशात त्याने ९ पैकी ८ मालिका आपल्या नावावर केल्या. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन २-१ वनडे मालिकेत विजय मिळवला. तर दक्षिण आफ्रिकेत ५-१ ,वेस्ट इंडीजमध्ये ३-१ ने विजय मिळवला. तसेच न्यूझीलंड, श्रीलंका, झिम्बाब्वे आणि बांगलादेशमध्ये जाऊन देखील विराट कोहलीने भारतीय संघाला विजय मिळवून दिले.

महत्वाच्या बातम्या : 

काळजात धस्स करवणारी बातमी! श्रीलंकेच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये हत्तीचा हल्ला, दोघांचा मृत्यू

विराटला वनडेच्या नेतृत्त्वपदावरून हटवल्यानंतर गांगुलींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, ‘त्याला विनंती केलेली…’

मातब्बर गोलंदाज झुलन गोस्वामीच्या बायोपिकमधून बाहेर झाली विराटची पत्नी अनुष्का शर्मा, पण का?

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---