---Advertisement---

रोनाल्डोला जुवेंटससाठी पहिला गोल करण्यास लागले तब्बल ३२० मिनिटे

On: सोमवार, सप्टेंबर 17, 2018 11:30 AM
---Advertisement---

फुटबॉल स्टार क्रिस्तियानो रोनाल्डोनला जुवेंटसकडून पहिला गोल करण्यास तब्बल ३२० मिनिटे लागली. सेरी ए या लीगमध्ये सॅसुआलो विरुद्ध त्याने हा गोल केला.

३३ वर्षीय रोनाल्डोला मागील तीन सामन्यात एकही गोल करता आला नाही. तर २७ प्रयत्नानंतर रोनाल्डोला गोल करण्यात यश आले आहे.

या सामन्याचे पहिले सत्र संपल्यावर एकही गोल झाला नाही. यावेळी ५०व्या मिनिटाला पहिला गोल करत रोनाल्डोने जुवेंटस बरोबरच स्वत:हाचेही गोलचे खाते उघडले. यानंतर त्याने १५ मिनिटांच्या फरकाने दुसरा गोलही केला.

हा सामना जुवेटंसने २-१ अश्या फरकाने जिंकला. यामुळे त्यांना पुर्ण तीन गुण मिळाले असून ते सलग चार सामने जिंकत क्रमवारीत पहिल्या स्थानावर आहेत.

रियल माद्रीदकडून नऊ वर्षे खेळल्यावर रोनाल्डोने जुवेंटस बरोबर ११६ मिलियन डॉलरचा करार केला आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या-

अखेर लाल माती गहिवरली!!!

रोनाल्डो, मेस्सी नंतर अशी कामगिरी करणारा हा तिसराच फुटबॉलपटू

प्रीमियर लीग: वॅटफोर्ड विरुद्धच्या थरारक सामन्यात मॅंचेस्टर युनायटेडच वरचढ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment