---Advertisement---

रुट- कोहलीबरोबर घडला क्रिकेटमधील सर्वात वेगळा योगायोग

On: बुधवार, नोव्हेंबर 14, 2018 5:17 PM
---Advertisement---

पल्लेकेल | इंग्लंड विरुद्ध श्रीलंका दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. परंतु त्यांचा हा निर्णय चांगलाच अंगलट आला आहे.

सध्या इंग्लंडने ७५.४ षटकांत सर्वबाद २८५ धावा केल्या आहेत. यावेळी अडचणीत असलेल्या संघाच्या मदतीला पुन्हा सॅम करन आला.

याच सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जो रुट केवळ १४ धावांवर बाद झाला. यामुळे त्याच्या कसोटीत ६३३१ धावा झाल्या. विशेष म्हणजे सध्या विराट कोहलीच्याही कसोटीत ६३३१ धावा आहेत.

विराट कोहलीने कसोटीत ७३ सामन्यात खेळताना ५४.५८च्या सरासरीने ६३३१ धावा केल्या आहेत तर रुटने ७६ सामन्यात ४९.८५च्या सरासरीने ६३३१ धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे रुट विराटपेक्षा तब्बल १४ डाव जास्त खेळला आहे.

वाचा महत्त्वाच्या बातम्या- 

१६१ कसोटीत कूकला जे जमले नाही ते सॅम करनने ७ कसोटीत करुन दाखवले

टीम इंडियाला नडलेल्या सॅम करनचा श्रीलंकेला तडाखा

डिव्हिलियर्स वादळाचा तडाखा, केले शानदार पुनरागमन

बालदिनाचे औचित्य साधून केकेआरने केले हे खास सेलिब्रेशन, पहा फोटो...

सुरेश रैनाचा रणजी ट्राॅफीमधील हा कहर कॅच पाहिलाय का?

,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment